(प्रतिनिधी-संतोष पाटील)

आज दि २४/०१/२०२२ रोजी दुपारी २.३० वाजता तालुका विधी सेवा समिती भडगांव व तालुका भडगांव वकील संघ यांच्या संयुक्त विधमाने, ” बालिका दिन ” निमित्त “पोक्सो “या विषयांवर कायदेविषयक शिबीर आदर्श कन्या महाविद्यालय भडगांव येथे आयोजीत करण्यात आलेले होते. यावेळी वरील विषयाचे वक्ता म्हणुन भडगांव येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता व्हि.डी. मोतीवाले साहेब यांनी अगोदर “बालिका दिना” निमित्त व नंतर पोक्सो या विषयांवर त्यातील विविध कलमे,तरतुदीवर सविस्तर विचार मांडलेत.त्यांनी सांगितले की,महाराष्टात दरवर्षी ३ जानेवारी रोजी साविञीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणुन साजरी केली जाते.त्या महान शिक्षिका,समाज सुधारिका व कवयिञी होत्या.त्यांचा जन्म ३ जानेवारी,१८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला.त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.साविञीबाईनी भारतातील महिलांचे शिक्षण व त्यांच्या मुलभुत अधिकारासाठी आपले अमुल्य योगदान दिलेले आहे.त्यांनी भारतातील लिंग भेदभाव दुर करण्यासाठी महत्वपुर्ण भुमिका बजावलेली आहे.साविञीबाई व महात्मा ज्योतीराव फुले पती पत्नीनी इ.स.१८४८ मध्ये पुणे येथे मुलीसाठी पहिली शाळा काढली.समाजात मुलीच्या हक्काविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी,लैंगिक असमानता दुर करण्यासाठी व समाजातील मुलीचा दर्जा उंचावण्यासाठी हा बालिका दिन साजरा केला जातो.साविञीबाईच्या शैक्षणिक कार्याची दखल घेणारा महत्वाचा दिवस आहे.हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणुन देखील साजरा करण्याची पध्दत आहे.आता The Protection Of Childen From Sexual Offences Act-2012 पोक्सो मराठीत लैंगिक गुन्ह्यापासुन बालकाचे सरंक्षण कायदा-२०१२ असे आहे. बालक ह्या संज्ञेमध्यै अठरा वर्षाखालील सर्व मुली/मुले यांचा समावेश होतो.बालक ही देशाची संपत्ती ,उद्याची पिढीमानली जाते.तीचे योग्य प्रकारे पालणपोषण,संवर्धन व्हावे,निकोप शारिरीक,मानसिक,बौध्दीक व सामाजिक विकास व्हावा,बालकास अत्याचारापासुन संरक्षण मिळावे.त्याचे हक्काचे संरक्षण व्हावे.व अपराध्यास कठोर शासन व्हावे.बालकांचे लैंगिक छळणुक,छेडछाड,अश्लिलता,कुकर्म ,बलत्कार,अत्याचार ह्या गोष्टीपासुन संरक्षण व्हावे म्हणुन हा विशेष कायदा अस्तित्वात आला.यांचेसाठी विशेष न्यायालयाची तरतुद करण्यात आलेली आहे.तक्रार नोंद करतेवेळी बालकाची तक्रार महिला पोलीस अधिकारीमार्फत नोंदविली जाते. पिडीत बालकाचे नाव गुप्त ठेवले जाते बालकांची वैधकीय तपासणी त्यांचे पालकाच्या अनुमतीने केली जाते.पिडीताचे पुनर्वसन केले जाते त्यांना नुकसानभरपाई दिले जाते.ह्या कायद्यानुसार बालकासमवेत करण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा लैंगिक व्यवहार हा गुन्हा आहे.यात गुन्हेगारास ३,७ ते आजीवन कारावास ची शिक्षेची व दंडाची तरतुद आहे .उत्तरप्रदेश,राजस्थान,महाराष्ट,आंध्रप्रदेश येथे गून्हे वाढल्याने,पोक्सो कायद्यात २०१८ मध्ये सुधारणा होउन,फाशी किंवा १० ते २० वर्षाची शिक्षा व दंडाची तरतुद करण्यात आलेली आहे.असे शेवटी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात भडगांवचे सहन्यायाधिश ईश्वर जे. ठाकरे साहेबानी मुलांनी मोबाईल व्यवस्थित हाताळाला पाहिजे.जर तुमच्याशी काही लैंगिक किंवा इतर काही चुकीच्या गोष्टीघडल्यास ,तुम्ही पहिली खबर दिली पाहिजे.पुढे त्यांची योग्य ती कायदेशीर कार्यवाही होवु शकते.असा मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी भडगांव येथील न्यायाधिश ईश्वर जे.ठाकरे साहेब, भडगांव येथील सरकारी वकील.व्हि.डी.मोतीवाले,भडगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब अहिरे,वकील बार सदस्य अॅड.प्रकाश.बी.तिवारी अॅड.मुंकुंद बी,पाटील अॅड.आर.के.वाणी,अॅड.के.टी.पाटील,अॅड.विनोद महाजन,अॅड.भरत ठाकरे,अॅड.विजय महाजन व इतर वकील मंडळी,न्यायालयीन अधिकारी नाझर चौधरी नाना,,लाहोरिया मॅडम,न्यायालयीन कर्मचारी वर्ग राजेंद्र माळी भाऊसाहेब,विजय महाजन,राठोड अनिल, भाऊसाहेब, बागड एम.बी. भाऊसाहेब विलास ठाकुर भाउसाहेब नितीन कदम भाऊसाहेब,नितीन पाटील भाऊसाहेब,चौधरी भाऊसाहेब जगदिश वाडिले,बी.डी.सोनवणे भाऊसाहेब,दायमा भाऊसाहेब,सोनजे भाऊसाहेब तसेच पोलीस कर्मचारी वर्ग, आदर्श कन्या शाळेचे मुख्याध्यापक रोकडे सर,भरपुर विद्यार्थीनी, शिक्षकवर्ग,कर्मचारी वर्ग हजर होते.सदर कार्यक्रमाची प्रस्तावनाची सुरुवात आदर्श कन्याविद्यालय/ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक रोकडे सरांनी केली.तसेच शेवटी सोनवणे सरानी सर्व उपस्थितीतांचे मनपुर्वक आभार मानून, वरील कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थीनी सहभागी झालेले होते.

Total Page Visits: 234 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply