जळगाव / पाळधी, ता. धरणगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रमाण मानून मी आयुष्यात वाटचाल केली आहे. एक नेता, एक पक्ष आणि एक विचार अशी शिकवण देणारा शिवसेना हा जगातील एकमेव राजकीय पक्ष असून विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. त्यांनी दिलेल्या बाळकडूमुळेच आज आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते हे मंत्री बनले असून शिवसेना हा पक्ष वटवृक्षासमान बहरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ना. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. तर, साहेबांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार आपण आगामी काळात देखील वाटचाल करत राहू अशी ग्वाही देखील दिली.*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पाळधी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात पाळधी येथील नागरिकांसाठी स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या जि.प. निधीतून पाळधीकरांसाठी इलेक्ट्रीक घंटागाडीचे लोकार्पण देखील करण्यात आले. सदर घंटागाडी ही इलेक्ट्रीकवर चालणारी असल्याने यातून पर्यावरण संवर्धन साधले जाणार आहे.*याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत होऊनच आपण राजकारणात सक्रीय झालो. त्यांच्या विचारांना प्रमाण मानून आजवर वाटचाल केली. मध्यंतरी एकदा पराभव देखील झाला. मात्र आपण डगमगलो नाही. निवडणूक हरल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अंत्यसंस्काराला हजेरी लाऊन आपण जनसेवेत रूजू झालो. याच प्रयत्नांनी पुन्हा विजयी होऊ राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री झालो आहे. राज्यात ग्रामीण भागातून शिवसेनेच्या मेळाव्यात बोलण्याची संधी आपल्याला सर्वप्रथम मिळाली असून हा आपल्या आयुष्यातील मोठा ठेवा असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.**घोषणांनी परिसर दणाणला*शिवसेनेचे उपनेते तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण सुरू केल्यानंतसर जुन्या आठवसनीना उजाळा देत असताना भावुक झाले तेंव्हा असंख्य शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाळासाहेब ठाकरे अमर रहे ! परत या – परत या बाळासाहेब परत या , नेताजी सुभाषचंद्र बोस अमर रहे ! शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेनेचे युवा जिल्हाधिकारी शिवराज पाटील, शिवसेनेचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, युवासेनेचे सहसचिव विराज कवडीया, पाळधी खु सरपंच शरद कोळी, पाळधी बु सरपंच प्रकाशनाना पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, , उद्योगपती दिलीप बापू पाटील, चंदू माळी, पप्पू माळी, दिगंबर माळी, सागर शिरोळे, अकबर खान, शरद देशपांडे, पप्पू शिंदे, पिंटू कोळी, धम्मा कुंभार, अरविंद मानकरी, दिपक साबळे, प्रशांत पाटील, अरुण पाटील, मच्छिंद्र साळुंखे, सुरेश पाटील, अमोल पाटील, स्वप्नील परदेशी, कृष्णा साळुंखे माजी जिल्हा परिषद सदस्य, अनिल पंडित, दिनकर पाटील, हाजी सुलतान, अमर सेठ, संजय देशमुख, संजू महाराज, उदय झंवर, दीपक भदाणे, बंडू पाटील, आबा माळी, भरत पाटील, संजय देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व महत्व विशद केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले.

Total Page Visits: 317 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply