पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या दोन महान विभूतींची जयंती आदरांजली वाहून संपन्न झाली. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते महान सेनानी क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून केली. उपरोक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस. पी. पाटील यांनी केले शाळेच्या शिक्षिका एस. पी. ठाकूर यांनी महान स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे करारी प्रेरणादायी व हिंदुस्तान देशाला क्रांतिकारक उठावाद्वारे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचे स्वप्न व त्यासाठी स्थापित केलेली आझाद हिंद सेना या सर्व घटना चक्राचे सुंदर वाणीत शब्दांकन केले. श्वेता कलंत्री यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन चरित्र कार्य तसेच हिंदुत्ववादी विचारसरणी या सर्व बाबींचा समन्वय करून स्थापित झालेली शिवसेना व त्याचे अंतिम श्वासापर्यंत मराठी जनतेला मिळवून देण्याचा आत्मसन्मान या सर्व उल्लेखनीय बाबींचा अलंकारिक आशयपूर्ण शब्दात वर्णन केला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे व पर्यवेक्षिक एम.एस. बारी यांनी सुद्धा या दोन महान विभूतींच्या जीवनातील ज्ञात-अज्ञात किस्से व प्रसंगाचे वर्णन आपल्या मनोगत पर भाषणातून प्रकट केले. उपरोक्त कार्यक्रमासाठी सहकार्य व मार्गदर्शन शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम.एस. बारी, ज्येष्ठ शिक्षक व्हि.पी बडवे, महेश माळी, प्रशांत वंजारी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले.
