दि.०९/१२/२०२१ निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, नंदुरबार या विशेष पथकाने ब-हाणपुर अंकलेश्वर रस्त्यावर हॉ तापी परिसर समोर येथे अवैधपणे परराज्यातील विदेशी मदयाची वाहतुक करतांना कंटेनरसह 62,76,480/- चा मुददेमाल जप्त दि. 08/12/2021 रोजी मा. श्री. कांतीलाल उमाप साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मा. श्रीमती वर्मा मॅडम संचालक (अं व द) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, विभागीय उपायुक्त मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब व अधीक्षक सो युवराज राठोड राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हॉटेल तापी परिसर समोर येथे पॅक बॉडी असलेला कंटेनर त्याचा परिवहन क्रमांक GJ-15-AT-6007 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स सदर कंटेनर मध्ये मिळुन आले. वाहनासह आरोपी इसम नामे मनोज कुमार मखनलाल विश्नोई या आरोपी इसमास अटक करण्यात आली. परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स (हरियाणा राज्य निर्मिती व विक्री साठी असलेले) किंमत 44,76,480/- रुपये, तसेच पॅक बॉडी असलेला कंटेनर त्याचा परिवहन क्रमांक GJ-15-AT-6007 असा एकुण 62,76,480/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ) (ई). 80,81,83,9098(2),103 108.व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420,465, 468, 471, अन्वये करण्यात आली. सदरची कार्यवाही श्री. डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, श्री.पी.जे. मेहता दुय्यम निरीक्षक, श्री. एस. एस. रावते दुय्यम निरीक्षक श्री हंसराज चौधरी, श्री. हेमंत डी पाटील, श्री. हितेश जेठे, अविनाश पाटील, अजय रायते इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. डी. एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक हे करीत आहे.दि.०९/१२/२०२१
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, नंदुरबार या विशेष पथकाने ब-हाणपुर अंकलेश्वर रस्त्यावर हॉ तापी परिसर समोर येथे अवैधपणे परराज्यातील विदेशी मदयाची वाहतुक करतांना कंटेनरसह 62,76,480/- चा मुददेमाल जप्त
दि. 08/12/2021 रोजी मा. श्री. कांतीलाल उमाप साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र
राज्य, मा. श्रीमती वर्मा मॅडम संचालक (अं व द) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, विभागीय उपायुक्त मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब व अधीक्षक सो युवराज राठोड राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली.
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हॉटेल तापी परिसर समोर येथे पॅक बॉडी असलेला कंटेनर त्याचा परिवहन क्रमांक GJ-15-AT-6007 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स सदर कंटेनर मध्ये मिळुन आले. वाहनासह आरोपी इसम नामे मनोज कुमार मखनलाल विश्नोई या आरोपी इसमास अटक करण्यात आली. परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स (हरियाणा राज्य निर्मिती व विक्री साठी असलेले) किंमत 44,76,480/- रुपये, तसेच पॅक बॉडी असलेला कंटेनर त्याचा परिवहन क्रमांक GJ-15-AT-6007 असा एकुण 62,76,480/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ) (ई). 80,81,83,9098(2),103 108.व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420,465, 468, 471, अन्वये करण्यात आली.
सदरची कार्यवाही श्री. डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, श्री.पी.जे. मेहता दुय्यम निरीक्षक, श्री. एस. एस. रावते दुय्यम निरीक्षक श्री हंसराज चौधरी, श्री. हेमंत डी पाटील, श्री. हितेश जेठे, अविनाश पाटील, अजय रायते इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. डी. एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक हे करीत आहे.
