चाळीसगांव (प्रतिनिधीआनंद गांगुर्डेचाळीसगाव ):-चाळीसगांव शहर पोलिसांनी कोळी वाडा येथील राकेश भिकन चौधरी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 11 किलो गांजासह 58 हजार रुपयांची रोकड पोलिसाना मिळून आली असून गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेसह तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी गुप्त माहीतगाराने दिलेल्या खबरी नंतर पोलीस निरक्षक पाटील यांनी सहा. पोलीस निरीक्षक विशाल जयसिंग टकले आणि पोलीस पोलीस पथकातील कर्मचारी यांना सूचना केल्या त्यांनी घटनास्थळी छापा घातला असता सौ.मिराबाई भिकन चौधरी वय 50 वर्षे घरात काहीतरी पुड्या तयार करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले महिला पोलीस कॉन्स्टेबल सबा शेख यांना बोलाऊन लागलीच घराची झाडा झडती घेतली असता घरात 1 लाख 66 हजार 620 रुपये किमतीचा प्लास्टिक गोणीत गांजा मिळून आला. त्या बरोबरच 58 हजार 670 रुपयांची रोकड देखील पोलिसांना मिळून आली पोलीस निरीक्षक श्री.के.के पाटील,यांना याबाबत माहिती कळवताचं नायब तहसिलदा. विकास लाडवंजारी सपोनि/विशाल टकले, स.पो.नि. विष्णु आव्हाड, स.पो.नि. सागर ढिकले, स.पो.नि. सचिन कापडणीस, पोउनि. अमोल पवार,यांना घेऊन त्यांनी घटनास्थळ गाठले पंचनामा करून 58 हजार 770 रुपयांची रोकड व 1 लाख 66 हजार 620 रुपयांचा गांजा असा एकूण 2 लाख 25 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला असून या प्रकरणी विशाल जयसिंग टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मीराबाई भिकन चौधरी (50) अजय उर्फ राकेश भिकन चौधरी दोन्ही रा. कोळीवाडा, घाटरोड, चाळीसगाव यांचे विरोधात गांजा व इतर मुद्देमाल बेकायदेशीर विक्री करण्याकरीता, जवळ बाळगतांना मिळुन आले म्हणुन एन. डी. पी. एस. ऍ़क्ट 1885 चे कलम 8 (क), 20(ब), ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

Total Page Visits: 16 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply