अमळनेर(तालुका प्रतिनिधी-संतोष पाटील) साने गुरुजी फौंडेशन, खान्देश विकास प्रतिष्ठाण, आधार संस्था, श्रम साध्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, महिला व बाल विकास विभाग जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमळनेर, येथे दि 26 नोहेंबर 2021 रोजी मतदान जन जागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला, या वेळी देह विक्री करण्याऱ्या महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची रूपरेषा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.विजयसिंग परदेशी साहेब यांनी केली . व अध्यक्ष स्थानी अमळनेर प्रांत अधिकारी सो. सिमा अहिरे मॅडम होते तसेच तहसीलदार मिलिंद वाघ सर यांनी मतदानाचे फायदे व संविधान दिना बद्दल माहिती दिली. या वेळी संविधान दिन निमित्ताने जगदिश पाटील यांनी संविधान चे वाचन सामूहिक वाचन केले,, संस्था चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वन स्टॉप सेंटर (महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार बद्दल)माहिती दिली. या वेळी आधार संस्था चे अध्यक्ष भारती पाटील,रेणू प्रसाद, श्रम साध्य संस्था चे गौरव माळी, सामाजिक कार्यकर्ते जयश्री ताई साळुंखे, जयेश माळी, शरद पाटील,जगदिश पाटील,पवन साळुंखे, आदी उपस्थित होते,
