महाराष्ट्रातील नाट्यगृह २२ ऑक्टोबर पासून सुरू झाले आहेत. जळगावातही नाट्यगृह खुले झाले आहे. या शासन निर्णयाचे स्वागत करून संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनने नाटकाचे आयोजन केले आहे. परिवर्तनची निर्मित असलेले साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील नाट्यरूपांतरीत ‘नली’ एकलनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व नाट्यगृह खुले करण्याचा निर्णय घेतला त्याला परिवर्तनने प्रतिसाद देत शासनाचे अभिनंदन करत जळगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अव्यक्त प्रेमाची साधी सोपी गोष्ट असेलेले हे नाटक राज्यभरातील अनेक शहरात सादर केले गेले आहे. या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी पन्नासावा प्रयोग उद्या २३ ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी ७ वा गंधे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. राजू मामा भोळे, प्रा. डी डी बच्छाव, डॉ रेखा महाजन, नगरसेवक व रंगकर्मी अनंत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृषी परंपरा, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था, सामाजिक वास्तव, शेतीचे प्रश्न, आणि प्रेम अशा विविध विषयांन स्पर्श करणारा हा नाट्यप्रयोग रंगभूमीवरील वेगळा प्रयोग म्हणून चर्चेत आहे. जळगावच्या हौशी रंगभूमीवरील एक नाटक राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण करत ५० प्रयोगांचा उच्चांक गाठतं ही जळगावच्या नाट्यसृष्टीतील विशेष बाब म्हटली पाहीजे. या एकलनाट्याचे दिग्दर्शन योगेश पाटील यांचे असून पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, वेशभूषा मंजुषा भिडे, प्रकाश योजना राहुल निंबाळकर, होरिलसिंग राजपूत यांचे आहे. रंगमंच व्यवस्था निलिमा जैन, प्रतिक्षा कल्पराज, मनोज पाटील, डॉ किशोर पवार, हर्षदा कोल्हटकर, पंकज पाटील, यांची तर निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व पुरूषोत्तम चौधरी हे आहेत. या प्रयोगासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्य लाभले आहे. नाट्यप्रयोगासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. असे आवाहन परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.

Total Page Visits: 268 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *