जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी गार्ड अँड जनरल वर्क युनियन संघटना आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असून अंजनी धरण विभाग गिरणा पाटबंधारे यांनी शिफारस देण्यास तयारी दर्शवली आहे तसेच जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत वाघुर धरण यांनी अजून पर्यंत चर्चा अथवा मार्ग निघालेला नाही. तसेच तिसरी मागणी म्हणजे अंजनी धरणावरील सात महिन्यात वेतनाचा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. वाधुर धरणावर पूर्वी काम केलेले सुरक्षारक्षक यांची यादी मागून मंडळास सादर करावी असे संबंधित विभागास वेळोवेळी लेखी निवेदन व आंदोलन करण्यात आलेले आहे. मात्र जळगाव पाटबंधारे विभाग यांनी मंडळास पत्र देऊन तुमच्याकडील सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करावा अशी मागणी पत्र सादर करून काही सुरक्षा रक्षकांवर अन्याय झालेला आहे. तरी पूर्वी काम केलेले सुरक्षारक्षक यांनी त्वरित शिफारस मंडळाचे सादर करावी. सध्या धरणावरती सुरक्षा ही रामभरोसे सुरू आहे असो त्वरित कार्यवाही करावी अन्यथा धरणे आंदोलन सुरूच राहील असे सोमा कढरे, फकीरा चव्हाण, गौतम पारवे, पुनमचंद निकम, सुरसिंग पाटील यांनी कळविले आहे.

Total Page Visits: 67 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *