रावेर तालुका प्रतिनिधी:- (ईश्वर महाजन ) दि.१२ सष्टेंबर वार रविवार – खिर्डी बलवाडी शेती शिवारात बऱ्याच दिवसंपासून रखडलेल्या पावसाचे विजांच्या कडकडाटात जोरात पुनरागमन झाले त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,खिर्डी ,बलवाडी , निंबोल , ऐनपुर या भागात खूप जोरदार पाऊसची बॅटीग सुरू आहे रावेर तालुकात काही दिवस पाऊस नव्हता पण नंतर जोरदार पावसाने अजून जोर पकडल्यामुले शेतकरांचे डोळ्यांसमोर आसमानी संकटदिसत आहे गेल्या दोन महीन्या आधीच पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळी पिक . पडल्यामुळेआर्थीक संकटात आहे व राज्य शासनामार्फेत अजुनही मदत मिळाली नाही पिक विमे काही शेतकऱ्याचे मिळाले नाही शेतकरी बॅक व विमा कंपन्या कडे मागणी लावुन धरली असुन शेतकऱ्याचे (कैवारी )नेता तालुक्यात नसल्याने पंचनामे नाममात्र झालेले दिसत आहे राज्याचे विरोधी पक्ष नेते , पालकमंत्री ‘ स्थानिक आमदार यांनी दिलेले आश्वासन कागदावरच राहीले आहे सध्या शेतकरी वर्गास कपाशीचे ७ हजारा पर्यंत भाव मिळतील ही आशा वाटत असतांना पाऊस जोरदार येत असल्यामुळे पिकाचे नुकसान कपाशी,उडीद,सोयाबीन,खराब होईल या चिंतेत शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसला आहे.केळी वर सीएमव्ही वायरस वाढत असल्याने शेतकरी मेटिस आला आहे तसेच बियाणे चे भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे .

Total Page Visits: 230 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *