साकळी ता यावल :- यावल तालुक्यातील साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे आरोग्य सेविका व शिपाई यांच्या एकूण 8 जागा रिक्त असल्याने पुरेशी अशी आरोग्य सेवा नागरिकांना मिळत नसुन मोठया प्रमाणात येथिल अपूर्ण स्टाप अभावी अडचणीचा सामना येथिल कर्मचाऱ्यांना करावा लागत असुन तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावे त्याच बरोबर साकळी ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरूपी ग्रामविकास अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना दिले आहे.सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक महिन्या भरापासून प्रा. आ. केंद्र साकळी येथे व ग्रामविकास अधिकारी तसेच पशु वैद्यकीय अधिकारी याच्या रिक्त जागा असुन साकळी गावं हे अतिसंवेदन शिल असल्याने 22 गावांचे नाते साकळी गावासोबत जुडलेले आहे अश्या परिस्थितीत प्रा. आ. केंद्र साकळी येथे ओ. पी. आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र साकळी येथे आरोग्य सेविका नाही, उपकेंद्र शिरसाड येथे आरोग्य सेविकांचे पद रिक्त, थोरगव्हाण येथे आरोग्य सेविकेचे पद रिक्त, उपकेंद्र बोरावल खुर्ड येथे आरोग्य सेविका पद रिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे तिन शिपाई पदे रिक्त असल्यामुळे मोठी कसरत येथिल आरोग्य विभागास करावी लागत आहे तसेच साकळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असतांना ग्रामविकास अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने प्रभारी ग्रामसेवक यांच्या कडे साकळी येथिल पदभार आहे तर पशु वैद्यकीय अधिकारी यांची सुद्धा पद रिक्त असल्याने प्रभारी पशु वैद्यकीय अधिकारी येथिल काम सांभाळत असुन मनुष्य बळ कमी पडत असुन रिक्त जागा तात्काळ भरण्यात येऊन होणाऱ्या परिणामास आळा बसवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना केली आहे

Total Page Visits: 181 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *