कोल्हापूरःअनिल पाटील

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने ५० जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, विकास पाटील, शंकर संकपाळ, राजेंद्र पाटील, सुनील माळी, सुकुमार पाटील, जी. एस. पाटील, अरविंद पाटील, वसंत जाधव, शानाजी माने, काका पाटील, नंदकुमार कांबळे, के. व्ही. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते रविवारी ता. ५ शिक्षक दिनी कागलमध्ये समारंभपूर्वक पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता सांगाव रोडवरील मटकरी हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील असतील. नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. शिल्पाताई शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, गट शिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, माजी सभापती राजश्री माने, कागल शहर राष्ट्रवादी अध्यक्ष संजय चितारी, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य अंजना सुतार, गडहिंग्लजच्या पंचायत समिती सदस्य सौ वर्षा कांबळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे अशी,……..
प्राथमिक विभाग……..
गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, प्राथमिक मुख्याध्यापक- विलास पोवार- बोरवडे, अभयकुमार वसवाडे- शेंडूर, शिवाजी पोवार- कासारी, प्राथमिक अध्यापक – गजानन गुंडाळे- मळगे खुर्द, युवराज सातुसे- बोरवडे, शामराव निकम- भैरेवाडी, आरती सोरप- कुंभारगेट-यमगे, विजय गवळी- चिखली, विजय पाटील- साके, महम्मद मुल्लाणी- आलाबाद, जैनब पटेल- कसबा सांगाव, तेजस्विनी पाटील- हमिदवाडा, महादेव डावरे- माद्याळ, अशोक मगर- बाळेघोल, पद्मश्री गुरव- शिप्पुर तर्फे आजरा, विलास माळी- वडरगे, आप्पासाहेब गजबर- भडगाव, धन्वंतरी आजगेकर- मडिलगे, मनिषा सुतार- मलिग्रे, बाबुराव गाडे- भादवणवाडी, अर्चना मगदूम- कागल, कृष्णा घाडगे- गडहिंग्लज.

माध्यमिक व महाविद्यालयीन…….. मुख्याध्यापक – शिवाजी चौगुले- नागनाथ एकोंडी, सुवर्णा मगदूम- प्राथमिक शाळा इंदिरानगर मौजे सांगाव, संगीता हिरुगडे- पिंपळगाव, पांडुरंग पाटील- भारतमाता बिद्री, प्रभावती पाटील- महालक्ष्मी सावर्डे बुद्रुक, मोहन कांबळे- भैरवनाथ बोळावी, नंदकुमार जोशी- श्रीराम हणबरवाडी, गजानन भोसले- चौंडेश्वरी हळदी, बाबासो बुगडे- शिवराज मुरगूड, माध्यमिक महाविद्यालयीन अध्यापक – कृष्णात पाटील- दत्ताजीराव भुजिंगराव मौजे सांगाव, भाऊसाहेब लाड- प्रियदर्शनी इंदिरा सिद्धनेर्ली, अशोक पाटील- मळगे बुद्रुक, बापू कांबळे- न्यू हायस्कूल बेलवळे खुर्द, रघुनाथ खतकर- दूधसागर विद्यानिकेतन बिद्री, राजाराम पाटील- आनंदराव पाटील बेलेवाडी काळम्मा, विलास पाटील- न्या. रानडे सेनापती कापशी, संभाजी अंगज- शिवराज मुरगुड, अरुण कुंभार- जयभारत कोल्हापूर, सुभाष भोसले- शाहू कागल, श्रीमती विद्या डुबल- सरलादेवी माने कागल, मधुकर खाडे- वि.दि.शिंदे गडहिंग्लज, सुधाकर मुळीक- शंकरचक्र पाटील दिंडेवाडी, अश्पाक मकानदार- जागृती गडहिंग्लज, माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षकेत्तर लिपिक – उमेश माळी- डी.एम. कसबा सांगाव, शानाजी माने- दौलतराव निकम व्हन्नुर, संपत कोळी- मुरगुड, बाबुराव पुंडे- डी.आर.माने कागल, प्रशांत म्हेत्री – दूधगंगा कागल.

Total Page Visits: 233 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *