आज २४ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान रावेर भारतीय जनता पक्ष रावेर तालुक्याच्या सर्व संघटनाच्या कार्यकर्ते यांनी राज्य शासनाच्या हिटलरशाही पणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज दुपारी अटक झाल्या नंतर भाजप ने आक्रमक पवित्रा घेत स्टेशन रोड येथील तहसिल कचरी समोरच रस्ता रोको करण्यात आला सदरहून दहा ते पंधरा मिनीट रस्ता रोको करण्यात आला राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यात ‘ राज्य सरकारचा निषेध असो ‘ ‘ह्या सरकारच करायच काय खाली डोकं वरती पाय ‘ नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध असो अश्या घोषणा देण्यात आल्या . भाजपा तालुका अध्यक्ष राजन दादा लासुरकर यांच्या नेतृत्वा खाली हा रस्ता रोको करण्यात आला सदर वेळी सुरेश पुना धनके उत्तर महाराष्ट भाजपा किसान मोर्चा प्रमुख, भाजपा उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीकांत महाजन,पी के महाजन, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, हिरालाल भाऊ कोळी नितीन पाटील, रवि पाटील, मनोज श्रावक, संदीप भाऊ सावळे, संजय दिनकर बुआ , सौ . योगीता ताई वानखेडे ‘ अनेक भाजप कार्यकर्ते हया रस्ता रोकोत उपस्थीत होते सदरहून रावेर पी आय रामदास वाकोडे साहेब यांनी आपल्या सर्व सहकार्या सोबत चोख बदोबस्त लावण्यात आला होता सदर हया रस्त्या रोकोने भाजप विरुध्द शिवसेना हा सामना पाहवयास राज्यभर व रावेर मध्ये मिळत आहे
