चिनावल तालुका रावेर( प्रतिनिधी लक्ष्मण ठाकूर)… शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक पास झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. विद्यालयातून सर्व मुलामुलींनी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मुलींनीच पटकावला. विद्यालयातून प्रथम क्रमांकाने कुमारी ऋतुंबरा राजेंद्र साळुंखे (95.8०) द्वितीय क्रमांक कुमारी वैभवी यशवंत दुसाने (94% ) तृतीय क्रमांकाने कुमारी समृद्धी प्रशांत नेमाडे (93.40) उत्तीर्ण झालेत. प्रथम तीन क्रमांक मुलींनीच पटकाविले. या सर्व गुणवंतीनचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री किशोर भिवसण बोरोले,सेक्रेटरी श्री गोपाळ देवचंद पाटील तसेच शालेय समिती सदस्य श्री मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार समारंभात नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले की, भविष्यात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन केले तसेच चेअरमन यांनी देखील मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना आवाहन केले भविष्यात अधिकारी होऊन शाळेचे नाव, गावाचे नाव उज्वल करावे आणि तुमचा सत्कार करण्याचा योग पुन्हा यावा, अशी भावना त्यांनी व्यक्त करून गुणवंतांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एच आर ठाकरे, उपमुख्याध्यापिका सौ मीनल नेमाडे, पर्यवेक्षक श्री पी एम जावळे, शिक्षक प्रतिनिधी सौ. नयना ठोंबरे मॅडम, श्री एल एम. ठाकूर, श्रीमती एम डी ढोले मॅडम, सौ कामिनी बोरोले मॅडम, श्री जी बी निळे सर श्री पी टी सोनवणे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री एम एस महाजन यांनी केले.
