कोल्हापूरःअनिल पाटील

गोकुळ दूध संघाची सत्ता महाडिक गटाकडे असताना गोकुळ बचाव कृती समिती मधील सतेज पाटील गटाचे प्रमूख शिलेदार आणि याच गटाचे भुदरगड तालुक्यामधील सेनापती म्हणून सचिनदादा घोरपडे अग्रस्थानी राहिले आहेत .बराच संघर्ष केल्यानंतर सतेज पाटील गट गोकुळ दूध संघाची सत्तासुत्रे आपल्या हाती घेण्यात यशस्वी झाला आहे .नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून सतेज पाटील गटातून सचिनदादा घोरपडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण ऐनवेळी सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी सचिन घोरपडेना गोकुळ च्या उमेदवारीपासून दूर व्हावे लागले .पण किमान आता स्वीकृत संचालक पदाच्या माध्यमातून तरी सचिन घोरपडे यांना संधी देऊन राधानगरी-भुदरगड तालुक्याला गोकुळ मध्ये प्रतिनिधित्व देण्याची मागणी या दोन्ही तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे . गोकुळ दूध संघाच्या नेतृत्वाची कमान पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडेच आहे . त्यामुळे निवडून आलेले एकवीस संचालक आणि स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात येणाऱ्या तीन संचालकामध्ये सचिन घोरपडे यांचे नाव समाविष्ठ करावे, अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे .निवडून आलेल्या एकवीस संचालकामध्ये तीन स्वीकृत संचालकांचा समावेश केल्यास गोकुळ च्या संचालक मंडळाची संख्या चोवीस वर जावून हा कोरम पूर्ण होतो. घोरपडे याना स्वीकृत संचालक म्हणून घेतल्यास या तालुक्यात काँग्रेसचे बळ वाढणार असल्याने गोकुळ दूध संघाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी हा निर्णय घ्यावा ,अशी अपेक्षा या तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत . याबाबत सतेज पाटील यांनी कोणतेही सूतोवाच केलेले नाही .पण गोकुळ दूध संघावरील महाडिक गटाचे गेल्या चाळीस वर्षांपासून असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी सचिनदादा घोरपडे यांनी सतेज पाटील गटाचे काँग्रेस पक्षाचे सेनापती म्हणून घेतलेले कष्ट पाहता आगामी स्वीकृत संचालक पदाची नावे निश्चित करताना सचिन घोरपडे यांच्याच नावाला पालकमंत्री सतेज पाटील झुकते माप देतील ,अशी अपेक्षा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे . यासाठी सर्वांचे लक्ष ” अजिंक्यतारा” मधून बाहेर पडणाऱ्या तीन संभाव्य नावाच्या लखोट्याकडे लागले आहे . येत्या जूनच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मूश्रीफ यांच्यात बैठक होणार असल्याचे समझते . या बैठकित स्वीकृत संचालकांची नावे घोषित होणार असल्याचे समजते..

Total Page Visits: 220 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *