चाळीसगांव(प्रतिनिधी)- आनंद गांगुर्डे

पवित्र रमजानची ओढ सगळ्या मुस्लिम बांधवांना असते. इस्लामिक धर्मानुसार हा महीना म्हणजे “अल्लाह से इबादत” चा महीना असतो.रमजानचा हा महीना “ईद-उल-फितर “ने समाप्त होतो. हा दिवस सर्व मुस्लिम बांधवांसाठी हर्षोल्लासचा दिवस असतो.स्वतः वर नियंत्रण व संयम ठेवण्याचा हा महीना असतो. आप्तस्वकीय व मित्रपरीवारासोबत शिरखुरमाचे सेवन करून रमजानच्या पर्वाची समाप्ती केली जाते. परंतु या वर्षी रमजानचे पर्व साजरे करतांना कोरोनाचे सावटं असल्याने अनेक गरीब मुस्लीम बांधवांना मर्यादा आलेल्या आहेत.महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक विजय शिवाजी चौधरी यांनी चौधरी वाडा, हुडको काॅलनी ,सुवर्णाताई नगर, जाकिर हुसेन सोसायटी,या परिसरातील 100 गरीब मुस्लिम बांधवांना परम पवित्र रमजान ईदच्या पूर्वसंध्येला शिरखुरमाचे वाटप करून जाती धर्माची बंधने उल्लंघून धार्मिक सहीष्णुता जपली आहे. लाँकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या 100 गरजू व गरीब मुस्लीम कुटुंबांना पवित्र रमजानची सांगता करण्यासाठी सुका मेवा जसे, (बदाम, काजू, खारी,खोबरे, चारोळी, किसमिस, खसखस, साखर ,तुप ,शेवय्या इ.) वाटप करून रमजानचा आनंद द्विगुणित केला आहे तसेच मागील वर्षी देखील शहरातील गरीब 300 कुटुंबांना किराणा साहित्य वाटप केले होते.व 75 कुटुंबाना शीर खुरमा बनवण्याचे साहित्य देखील वाटप केले. तसेच मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी 25000/-हजार रुपयांची मदत देखील केली होती. यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण, चाळीसगाव तेली समाज अध्यक्ष दिलीप रामराव चौधरी,नगरसेवक सुरेश हरदास चौधरी तेली पंच मंडळाचे सचिव पवार गुरुजी,बाळासाहेब उखा चौधरी,नगरसेवक रामचंद्र यशवंत जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,जिल्हा उपाध्यक्ष भाईसाहब अल्लाउद्दीनशेख,नगरसेवक फकिरा मिर्झा, सामाजिक कार्यकर्ते सदानंद मधुकर चौधरी,नगरसेवक जगदीश रघुनाथ चौधरी,नगरसेवक बाप्पु आहिरे मा. नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी,ज्ञानेश्वर रामराव चौधरी ,समाजीक कार्यकर्ते सूरेश पहेलवान, श्याम चौधरी,यांच्या हस्ते किराणा साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विजय चौधरी यांचे सर्वच स्थरावरुन कौतुक होत आहे.
तसेच यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन विजय चौधरी यांनी यावेळी केले.

Total Page Visits: 486 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *