चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे

चाळीसगाव येथील सुसज्ज अश्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये कोरोना बाधितांची वाढती रूग्णसंख्या बघता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे परंतु राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत जिल्हाधिकार्‍याकडून परवानगी मिळून आणली तर लोकसहभागातून हया ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारणे सहज शक्य आहे.जिल्हयात अनेक तालुक्यामध्ये उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी अनेक समाजसेवी संघटना पुढाकार घेत आहेत.कोल्हापूर जिल्हयातील गडलिंगज तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयात कमी पैश्यात ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे तेथील रूग्णांना सुरळीतपणे ऑक्सिजन मिळत आहे. हा प्रकल्प इतरांसाठी नक्कीच पथदर्शी ठरणारा आहे.त्या धर्तीवर चाळीसगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये देखील ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती शक्य आहे.त्यामुळे भविष्यात देखील संकटकाळी निर्माण होणारा ऑक्सिजनचा प्रश्न देखील कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.चाळीसगाव तालुक्याचे आमदार ,खासदार,नगरसेवक,मेडिकल असोशिएशन,डॉक्टरांची आयएमए संघटना, व्यापरी संघटना ,राजकीय पक्ष, सामाजिक ,शैक्षणिक संस्था ,रोटरी क्लब यांच्यासारख्या आणखी इतर संघटनांनी आर्थिक सहकार्य केल्यास हा प्रकल्प सहजपणे लोक सहभागातून उभारला जाऊ शकतो.शासनाकडे ऑक्सिजन पुरवठयासाठी अवलंबून राहण्यापेक्षा स्वमालकीचा हा प्रकल्प कधीही फायदेशीर ठरेल. त्याचा फायदा संपूर्ण तालुकावासियांना आताच्या सकंटकाळी व भविष्यात देखील होईल यासाठी सामाजिक संघटना,संस्था,समाजसेवक,लोकप्रतिनिधींनी जनजागृती करणे गरजेचे आहे.चाळीसगाव येथे ऑक्सिजन प्रकल्पासाठी लोकचळवळ उभारून हा प्रकल्प कार्यन्वित होणे काळाजी गरज आहे.त्यामुळे मतभेद विसरत सर्वांनी एकत्र येत हया प्रकल्पासाठी योगदान देणे महत्तवाचे ठरणार आहे.

Total Page Visits: 635 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *