भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांचा गंभीर आरोप…

कोल्हापूर ःअनिल पाटील

गोकुळ संघ ताब्यात घेण्याची दिवास्वप्ने पाहाणाऱ्या आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कडून जनतेचा जीवाशी खेळ सुरू आहे..
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थाच्या निवडणूका घेण्यास स्थगीती दिली आहे.एकीकडे संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगीक संस्था, कारखाने यांना अती कठोर निर्बंध लावले आहेत. जबरदस्तीने कारखाने बंद केले जात आहेत पण त्याचवेळी गोकुळ निवडणूक घेण्याचा आट्टाहास कशासाठी असा थेट सवाल भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथा जी पाटील यांनी उपस्थित केला.
पालकमंत्र्यांच्या हेकेखोर भुमिकेमूळे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली आहे. आजच शाहूवाडी तालूक्यातील डोणीली येथील गोकुळचे ठराव धारक मतदार सुभाष सदाशिव पाटील यांचा कोरोना मुळे मृत्यु झाला. काही दिवसा पूर्वी राधानगरी भुदरगड च्या आमदारांनी गोकूळ ठराव धारकांचा मेळावा घेतला त्यामध्ये ते स्वतः कोरोना पॉझिटिव आले व ८ ठराव धारक पॉजीटीव आले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमीत कमी ५० ते ६० ठराव धारक बाधीत झाले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी मृत्यु होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामूळे गोकुळ ची निवडणूक घ्यायचीच असा दूराग्रह करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या माथ्यावर कोरोना बळींचे पाप असेल असा स्पष्ट इशारा नाथाजी पाटील यांनी दिला आहे.डोणीली मधील सुभाष पाटील यांचा मृत्यु हा कोरोना बरोबरच पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी आहे.
गोकुळ ची निवडणुक उच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे असे सांगीतले जाते. हा आदेश १२ मार्च रोजी झाला. पण जर राज्यातील कोरोना परीस्थीती बिघडली तर राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यास स्थगिती दिली जाईल. असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. सद्या राज्यातील व कोल्हापूर जिल्हयातील कोरोना परीस्थीती अत्यंत बिकट असताना, एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर मिळत नाहीत, रेमडीसीवीर इंजक्शनचा तुटवडा आहे . लोकांचे प्रचंड हाल होत असताना राज्य शासनाने न्यायालयात असे म्हणणे मांडले की आम्ही ही निवडणूक काळजीपूर्वक व सर्व खबरदारी घेऊन करू , त्यामुळे गोकुळ ची निवडणूक पून्हा सुरू झाली. एकीकडे गोकुळ ची निवडणूक घेण्याबाबत कोरोना परीस्थीतीचा विचार करावा असे उच्च न्यायालयाने सुचवले आहे. पण वैयक्तिक राजकिय असुरी महत्वकांक्षा आणि विघ्नसंतोषीपणामूळे पालकमंत्री गोकुळच्या निवडणूकीत उतरले आहेत . त्यातून पदाचा व सत्तेचा गैरवापर करत पालकमंत्र्यांनी गोकुळ ची निवडणूक होण्यासाठी सभासदांचा विचार केल्याचे दिसून येत नाही. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पालकत्वही आपल्याकडे येते याचा आपणास विसर पडला आहे काय ? असा सवाल श्री पाटील यांनी उपस्थीत केला…
संपूर्ण राज्यात आणी जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले असताना व राज्यातील अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे गेल्या असताना महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांना गोकुळ ची निवडणूक घेण्याची घाई का आहे याचाही खुलासा करावा.एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने, एमआयडीसी बंद ठेवाव्यात इतके कठोर निर्देश दिले जातात. आणि त्याचवेळी गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवली जाते यातून पालकमंत्र्यांना नक्की काय साध्य करायचे आहे असा सवाल बाजार समीती कोल्हापूरचे माजी संचालक व भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी उपस्थित केला……

Total Page Visits: 709 - Today Page Visits: 4
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *