जिल्हा प्रतिनिधी- लक्ष्मण ठाकुर


सविस्तर वृत्त असे की,निंभोरा येथील वृत्तपत्र एजेंट व गुरव समाजाचे जेष्ट कार्यकर्ते प्रभाकर सखाराम गुरव यांना लहानपणा पासून त्यांची सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आपण स्वखर्चाने उभारावे ही जिद्द होती व संकल्प होता शाळेचे शिक्षण घेऊन त्यांनी १५ वर्ष वयाचे असतांना तेव्हा पासून वृत्तपत्र एजेंट म्हणून काम सुरु केले. त्यांचे वय आज ७५ झाले असून ते निरव्यसनी राहून कष्ट करून वृत्तपत्र निंभोरा,खिर्डी,चिनावल, वाघोदा, ऐनपुर,कुंभारखेडा,बलवाडी, तांदलवाडी यासह आदि ठिकाणी सायकल वरुन प्रवास करून वर्तमान पत्र घराघरात पोहचवण्याचे काम केले.आणि आपल्या व्यवसायातुन तसेच लोकसहभागातुन तसेच गुरव समाजाचे सहकार्य घेऊन आपल्या मालकीच्या १५०० स्केअर फुट जागेत १५बाय 20 या जागेत मंदिर बांधकाम करून ३दिवस प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम करून सप्तश्रृंगी देवीची मूर्ति पंढरपुर येथून आणुन त्या सोबत गणपति, नंदी, कासव, महादेव यांच्या पिंडीची स्थापना केली.व मंदिरात देवीची मूर्ति बसविली .साडेतीन फुट देवीची मूर्ति ,कळस साडेतीन फुट ,व सुबक बांधकाम केले. मंदिर अत्यंत सुबक सुंदर बांधलेले आहे. दररोज भाविक दर्शन घेत असतात सकाळी ६.३० तर संध्याकाळी ६.३०वाजता आरती प्रभाकर गुरव, मुलगा राजेश गुरव हे करतात.तर हरिपाठ संध्याकाळी सर्व महिला करतात. गेल्या ५५ वर्षापासून ते दरवर्षी नाशिक येथील सप्तश्रृंगी माता गडावर ते जात असत तसेच पंढरपुर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला जात असत. मंदिर उभरण्याच्या संकल्प पूर्ण केला.
परिवारातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य
प्रभाकर गुरव यांच्या पत्नी सौ. सिंधु गुरव, मुले राजेश गुरव,लीलाधर गुरव, संदीप गुरव, राहुल गुरव तसेच सुना सौ. कमल गुरव, सौ. किरण गुरव, सौ. भावना गुरव तसेच निखिल गुरव, सार्थक गुरव, श्रेया गुरव, तसेच जवाई सुभाष व्यवहारे, सौ. माधुरी व्यवहारे,मनोज विटकरे,सौ. अंजू विटकरे, कमलेश वाघमारे, सौ. दीपाली वाघमारे त्याचबरोबर ग्रामस्थांचे व गुरव समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.