कोल्हापूरः अनिल पाटील

     कोविड १९ च्या महामारीत आपल्या जीवाची परवा न  करता हिंमतीने लढणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर कार्यकर्ता योद्धयांचा व जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष -उत्तमदादा कांबळे यांनी केले आहे.

  भारत देशातच नाही तर साऱ्या जगामध्ये कोविड १९  ने थैमान घातले .सारी जनता ही जगबुडी तर नाही ना?  या विचाराने भयभीत झाली.कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात या महामारीने जनतेला दारिद्य्राच्या खाईत नेऊन डोळ्याला पाणी आणले .  डॉक्टर, पोलीस,आरोग्य कर्मचारी  याप्रमाणे अनेक  सामाजिक संस्था कार्यरत राहिल्याच पण सामाजिक विचारसरणी व  अन्यायाविरुद्ध लढणारा रिपब्लिकन पक्ष सुद्धा  मागे राहिला नाही .रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महामारीला न घाबरता आपल्या जवळील जनतेला अन्न, वस्त्र,कपडालत्ता तसेच शासन व प्रशासनाच्या आव्हानानुसार रक्तदान शिबिरे,शेणी दान अशा अनेक सुविधा देऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता समाजीकतेचे भान राखून आदर्श निर्माण केला.  म्हणूनच अशा कोविड - १९ मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या बहाद्दर भीमसैनिकांचा व  नूतन जिल्हा सरचिटणीस -संजय जिरगे सर,नूतन जिल्हाउपाध्यक्ष- जानबा कांबळे व जिल्हाउपाध्यक्ष - दत्ता मिसाळ यांचा सन्मान तसेच रिपब्लिकन चळवळीला अखंडपणे अविस्तरपणे दिलेल्या योगदानाबद्दल महा.प्र.सचिव मंगलराव माळगे व महा.प्र.सहसचिव बी.के.कांबळे यांचा कृतज्ञता सन्मान  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता अक्षता मंगल कार्यालय कावळा नाका कोल्हापूर. येथे करण्यात येणार आहे.सदर सन्मान परीषदेचे उद्घाटक प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष  रिपाई'चे जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) हे भुषविणार आहेत.तरी  सर्व  पदाधिकारी  व कार्यकर्त्यांनी  हजारोंच्या संख्येने( तोंडाला मास्क लावून) हजर रहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केले.
Total Page Visits: 231 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *