कोल्हापूरः अनिल पाटील

चंद्रे. (ता. राधानगरी) येथील लोकनियूक्त सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई यांच्याविरोधात आज नऊ विरूद्ध एक मतानी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई या ग्रामपंचायत सदस्यानां विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होत्या. त्यांच्या कूटूंबातील व्यक्तीचा ग्रामपंचायतीच्या कारभारत हस्तक्षेप करत होता. ग्रामपंचायतीच्या सदस्यानां विश्वासात न घेता आर्थिक खर्च करत होत्या. ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये परस्पर ठराव चर्चेला घेत होत्या. सदस्यानां प्रोसिङिंग दाखविण्यास ग्रामसेवकानां मज्जाव करणे’ तसेच गावातील अतिक्रमणामध्ये सोयीस्कर दूर्लक्ष करत होत्या.म्हणून विरोधी सर्वपक्षीय र्भेरवनाथ विकास आघाङीच्या नेत्यांनी राधानगरीच्या तहसिलदार मिना निंबाळकर यांच्याकङे सरपंचाविरोधात दि. 19/10/2020 रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानूसार मूंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 अन्वये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची आज विशेष सभा चंद्रे ग्रामपंचायतीमध्ये आयोजीत केली होती. सभेच्या अध्यक्षस्थांनी राधानगरीच्या तहसिलदार मिना निंबाळकर होत्या. सकाळी 11 वाजता झालेल्या सभेमध्ये सरपंचाविरोधात नऊ विरूद्ध एक मतानी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला .तर सरपंच गटाच्या दोन सदस्यांनी सभेकङे पाट फिरविली.
सन 2017 ला झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवङणूकीत सर्वपक्षीय नेते यांची र्भेरवनाथ विकास आघाङी यांच्याविरोधात र्के. शिवराम र्भेरू पाटील यांच्या गटामध्ये दूरंगी लढत झाली होती.यामध्ये र्भेरवनाथ विकास आघाङीला नऊ जागा मिळाल्या होत्या.तर र्के. शिवराम र्भेरू पाटील गटाला लोकनियूक्त सरपंचपदासह दोन जागा मिळाल्या होत्या.

सभेस उपसरपंच र्सो. लता बळवंत पाटील”” सदस्य आप्पासो श्रीपती पाटील””शोभराज बजरंग सूतार””श्रीमती अनूसया श्रीपती पाटील””सचीन पांङूरंग पाटील”” र्सो. सारिका सिद्धीविनायक गिरीबूवा””र्सो.मनिषा उत्तम गिरीबूवा””नेताजी महीपती साठे””र्सो. शूभांगी भाऊसो दाभाङे उपस्थित होत्या.

 दरम्यान  या ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी राष्ट्रवादीचे नेते ङी.जी. पाटील""यूवा नेते  सूनिल दतात्रय पाटील गटाच्या  र्सो. शूभांगी  भाऊसो  दाभाङे यांची वर्णी लागणार असल्याचे समझते.
Total Page Visits: 25 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply