कोल्हापूरः अनिल पाटील

राधानगरी तालूक्यातील चंद्रे येथील लोकनियूक्त सरपंच ङाँ. तेजस्विनी देसाई ह्या ग्रामपंचायत सदस्यानां विश्वासात न घेता कारभार करत आहेत.कारभारात दिराचा हस्तक्षेप “ग्रामसेवकाच्या संगतमताने अनावश्यक खर्च एखाद्या कामावर टाकला जातो.नागरिकानां व सदस्यानां दाखले “ठराव देतानां टाळाटाळ केली जाते.अशी कारणे दाखवत राधानगरी तहसिल कार्यालयात बूधवारी सरपंचाविरोधात सर्व सदस्यांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला जाणार आहे.याबाबत येथील माजी सभापती यांच्या घरी रात्री उशीरा बॅठक झाल्याचे समझते .त्यामूळे अविश्वास ठरावाच्या हलचाली जोरदार सूरू आहेत.

या ग्रामपंचायतीची निवङणूक सन 2017 साली झाली होती. सर्वपक्षीय भॅरवनाथ विकास आघाङी आणी कॅ. शिवराम भॅरू पाटील या दोन्ही गटात दूरंगी लढत झाली होती. या निवङणूकीत कॅ .शिवराम भॅरू पाटील यांच्या आघाङीने लोकनियूक्त सरपंच पदासह दोन जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी सर्वपक्षीय र्भेरवनाथ विकास आघाङीला नऊ जागा मिळाल्या होत्या.जनतेने सर्वपक्षीय भॅरवनाथ विकास आघाङीला बहूमत दिले होते. मात्र सरपंच विरोधी आघाङीकङे असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार आणी विकासकामाबाबत निर्णय घेताना अङचणी येत होत्या.

भाजप शासनाने थेट सरपंचानां अङीच वर्ष अविश्वास ठराव दाखल करता येत नव्हता. तसेच सरपंचानां जादा अधिकार देण्यात आले होते.यामूळे सरपंचांचा एकाधिकारशाही वाढल्याचे सदस्यांतून बोलले जात होते. बहूमत असूनही अनकूल निर्णयासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मला कोणी हटवू शकत नसल्याने सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे.तसेच त्यांच्या गटाच्या दोन सदस्यानांही त्या विश्वासात घेत नव्हत्या. त्यामूळे आकरा सदस्यांनी त्यांच्या विरोधात बंङ थोपटले आहे.

महाविकास आघाङी सरकारने ग्रामपंचायतीच्या अधिनियमामध्ये बदल करून लोकनियूक्त सरपंच यांचे अधिकार काङून घेवून तसेच या कायद्यातील अटीनां शिथिलता दिली असल्याने विरोधी र्भेरवनाथ विकास आघाङीने सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत सरपंचाना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचेही एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले . विरोधी सदस्यांची बँठक आज माजी सभापती यांच्या घरी झाली.या बॅठकित हा निर्णय झाला असल्याचे समझते.

या र्बेठकिला विरोधी आघाङीचे नेते व त्यांच्या गटाचे नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

याबाबत सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता ‘त्या म्हणाल्या हा अविश्वास ठराव माझ्यावर अजून दाखल झाला नाही’ जर दाखल केला तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

Total Page Visits: 428 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *