कोल्हापूरः अनिल पाटील

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, आठ महिन्यांत पिंपरी चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार झाल्याचे ट्‌विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 5 ऑक्‍टोबर रोजी केल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र वास्तविक पाहता गेल्यावर्षी भाजपची सत्ता असताना याच आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 47 खून आणि 121 बलात्काराचे गुन्हे घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची बदनामी करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यामुळे “भाजपा’चे पितळ उघडे पडले आहे. वस्तुत: भाजपाची सत्ता गेल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचा आलेख काही प्रमाणात कमी झाल्याची बाबही या आकडेवारीमुळे समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अत्याचार आणि खून प्रकरणामुळे भाजपची संपूर्ण देशात नाचक्‍की झाली आहे. महाराष्ट्रातील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवत योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याला उत्तर देण्यासाठी आता भाजपही मैदानात उतरला आहे. नुकत्याच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारला चपराक देण्यासाठी आणि टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी देत राज्य सरकारवर टीका केली.

Total Page Visits: 105 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply