जळगाव दिनांक 2 -राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरशास्त्री जयंतीनिमित्त आदिवासी वस्ती जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भिल्लवस्ती गालापूर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून थोर महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना अहिंसा व स्वच्छतेची शपथ देण्याचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील , सुनील भील, सुभाष भील यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी महापुरुषांचे विचार सर्वांना प्रेरणादायी असतात त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जीवनात कितीही अडचण आली तरी अजिबात सोडायचा नाही यातून खऱ्या अर्थाने सामाजिक व राष्ट्रीय विकास होत असतो असे सांगून जीवनात सत्य अहिंसा शांतता व निर्भयता यांचे असलेले महत्त्व विशद केले. विद्यार्थी शिवनेर सुरेश भील प्रातिनिधिक स्वरूपात शपथ घेतली. महापुरुष एका दिवसात होता येत नाही व महापुरुषांचे विचार कोणालाही लगेच संपवता येत नाहीत असे यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. म्हटले.आदिवासी वस्ती काठेवाडी वस्ती व गावातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर शिक्षिका श्रीमती जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर माहिती देत जीवनात शिस्त स्वच्छता व शांततेचे महत्त्व असल्याचे पालकांना व विद्यार्थ्यांना पटवून विद्यार्थ्यांना नियमित शालेय अभ्यास दिला. ग्रुप ग्रामपंचायत गालापूरअंतर्गत येणाऱ्या या शिक्षक दांपत्याने कोरोणा काळात स्वच्छेने सुरू केलेली घर घर शाळा शाळा शिक्षण आपल्या दारी ही संकल्पना राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरल्याने तसेच या उपक्रमात त्यांनी सातत्य राखले आहे. राष्ट्रातील प्रत्येक घर ही एक शाळा असून प्रत्येक आई वडील शिक्षक आहेत ही भूमिका आता पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोणा काळात साजरी झालेल्या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पालकांनी शासनाचे व शिक्षकांचेकौतुक केले.

Total Page Visits: 183 - Today Page Visits: 3
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply