कोल्हापूरः अनिल पाटील

२८ वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आज सीबीआय विशेष न्यायालयाने निकाल सुनावला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, असा निकाल देत न्यायालयाने या प्रकरणातील सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या आरोपपत्रात एकूण ४९ आरोपी आहेत. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२ आरोपी आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांचा समावेश आहे.

न्यायालयात सुनावणीवेळी २६ आरोपी उपस्थित राहिले होते. तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान, महंत नृत्य गोपाल दास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्ट सुनावणीदरम्यान हजर राहिले.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर फैजाबादमध्ये एफआयआर नोंद झाले होते. हे एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात नोंदवण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सीबीआयने ५ ऑक्टोबर १९९३ रोजी ४९ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. आता तब्बल २८ वर्षानंतर या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल सुनावला.

अडवाणी, जोशी यांच्यावर काय होता आरोप?

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने मिळून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीजवळ कारसेवेची घोषणा केली. जिथे बाबरी मशिदीचा काही भाग पाडला होता त्या जागेपासून १००-२०० मीटर दूरवर एक रामकथा कुंज मंच तयार करण्यात आला होता. येथून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, अशोक सिंघल आणि विनय कटियार यांच्यासह अनेक लोकांनी भाषणे दिली होती. सीबीआयने आरोपपत्रात या नेत्यांवर भडकाऊ भाषणे देण्याचा आरोप केला होता.

लाईव्ह अपडेट्स…

२६ आरोपी कोर्टात हजर

-लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान, महंत नृत्य गोपाल दास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्ट सुनावणीसाठी हजर

-न्यायाधीश एस के यादव कोर्टरुममध्ये दाखल

६ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश

लखनौ -सीबीआय कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त

Total Page Visits: 718 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *