कोल्हापूरः अनिल पाटील

देशावर तसेच विशेषतः महाराष्ट्रावर गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक सण-उत्सव रद्द करण्यात येत आहेत तसेच काही सण-उत्सव साधेपणाने नियम पाळून साजरे करण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आगामी काळातील नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे नियमवाली?

नवरात्रौत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी मूर्तीची उंची 4 फुटांपेक्षा तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटांपेक्षा जास्त नसावी. तसेच देवीची मिरवणूकही काढता येणार नाही.
सोशल डिस्टन्सिंगचा नियम हा दर्शन रांगांमध्ये पाळावा लागणार असून मंडपामध्येदेखील सॅनिटाझयरचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.
गर्दी न करता धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून गरबा, दांडिया अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.
नवरात्रीच्या शेवटी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहनास परवानगी असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गर्दी न करता रावण दहनास परवानगी असेल.
दरम्यान, सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

Total Page Visits: 36 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply