कोल्हापूरः अनिल पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष असून आरक्षणासाठी भुदरगड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करणेत येत आहे. आज भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गारगोटी कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करणेत आले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासाठी सकाळी दहा वाजलेपासूनच तालुक्यातून आंदोलक एस. टी. स्टँड परिसरात जमा होत होते. आंदोलकानी गारगोटी कोल्हापूर मार्गावर ठिय्या मारला. रस्ता अडवून धरल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरच्या बाजूने व गारगोटी शहराच्या बाजूने सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकाकडून एक मराठा-लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी करणेत येत होती.यावेळी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाचे समन्वयक आनंद चव्हाण यांनी आरक्षणाची भूमिका मांडली. या प्रसंगी सचिन भांदिगरे, मचिंद्र मुगडे, कु. किरण किशोर आबिटकर, डॉ. राजीव चव्हाण यांची भाषणे झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य शासनाने नोकर भरती करू नये. कायमस्वरूपी आणि टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने ठोस प्रयत्न करावेत. सारथी संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी द्यावा. सर्व खासदारांनी संसदेला घेराओ घालावा अशा मागण्या करणेत आल्या. भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांना आंदोलनस्थळी किरण आबिटकर या मुलीने निवेदन सादर केले.या आंदोलनात मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विश्वनाथ कुंभार, सत्यजित जाधव, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सौ. स्नेहल कोटकर, प्रविणसिह सावंत, बाबा नांदेकर, किशोर आबिटकर, शिवसेनेचे प्रकाश पाटील, अरुण शिंदे,अविनाश शिंदे, दिपक देसाई, संग्राम सावंत, तानाजी देसाई, शरद मोरे, विश्वजित जाधव, समन्वयक संदीपराज देसाई(लोटेवाडी), संदीप पाटील,(खानापूर) संजय वास्कर, तुकाराम देसाई (मिणचे), शशिकांत पाटील(तिरवडे), शैलेश गुंड, शशिकांत वाघरे, जयवंत गोरे, सुशांत माळवी, अजित चौगुले, संग्राम सावंत, राजू चिले, सुशांत सूर्यवंशी, भुजंगराव मगदूम (खानापूर), राजू दबडे, आनंदा देसाई (म्हसवे), प्रा विनायक कळके (आकुर्डे) यांचेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Page Visits: 33 - Today Page Visits: 3
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply