जळगाव.(अनिल मोरे)- दिनांक २५ संपूर्ण देशातील शाळांच्या कामगिरी अहवाल( परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) केंद्र शासनाने नुकताच जाहीर केला असून त्यात महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे लोकसंख्या आणि राज्याच्या भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राचे शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे .नॅशनल अचीवमेंट सर्वे, यु-डायस प्लस एमडीएम आणि शगुन पोर्टलच्या माध्यमातून शाळांची आकडेवारी गोळा करून तिच्या माध्यमातून पीजी आय इंडेक्स जाहीर केला जातो .यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षकांची संख्या अध्यापनाची अद्ययावतता शाळेतील भौतिक सोयीसुविधा प्रयोगशाळा क्रीडांगण गुणवत्ता अशा जवळपास ७०निकषांवर हे मूल्यमापन केले जाते. दिल्ली आणि महाराष्ट्र एकाच श्रेणीत भौतिक सोयीसुविधा इमारती संदर्भात आला असून सर्व श्रेणी व निकषांचा विचार केला सर्व निकषांचा विचार केला तर महाराष्ट्र संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे.ज्या बाबींमध्ये आपण कमी पडलो तिथे अधिक लक्ष केंद्रित केल्याने एकूण अहवालात आपण क्रमांक एक पटकावला.महाराष्ट्रात विद्यार्थी शिक्षक आणि शाळांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे आपली श्रेणी वरचढ ठरली असे राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक संशोधन परिषद पुणे चे संचालक डॉक्टर दिनकर पाटील शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले.तर २०१६ पासूनच परिणामांचा विचार करून शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग उपक्रम सुरू केल्याचा आता परिणाम दिसत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव श्री नंदकुमार यांनी म्हटले.या संदर्भात शिक्षक व शिक्षक संघटनांची भूमिका म्हणून बोलताना राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव किशोर पाटील कुं झरकर म्हणाले की,एकूणच महाराष्ट्राच्या प्रगती संदर्भात राज्यातील सर्व शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक सर्व अधिकारी प्रशासन पालक लोकप्रतिनिधी आणि सर्व शिक्षक संघटना समन्वयाने कार्य करत असून विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार,राज्याचेसर्व मंत्रिमंडळ , सर्वपक्षीय आमदार, सर्व शिक्षक आमदार,त्याच जोडीने शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण विभागाचे सचिव वंदना कृष्णा,जोडीने शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी ,एस सी ई आरटी चे संचालक डॉक्टर दिनकर पाटील , दिनकर टेमकर , समता विभाग आयटी विभाग संशोधन विभाग विविध भाषा विभाग राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख प्रयोगशील शिक्षक, मुख्याध्यापक त्या जोडीने राज्यातील सर्व डायट त्यांचा स्टाफ शिक्षण क्षेत्रात सकारात्मकरीत्या काम करणारे शिक्षक एनजीओ राज्यातील सर्व शिक्षक संघटना त्यांचे सर्व सहकारी सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षण सभापती पत्रकार बांधव पालक शाळा व्यवस्थापन समित्या ,सर्व पंचायत समिती यांचा महाराष्ट्र राज्यातील असलेला समन्वय सातत्याने सर्वांच्या प्रयोगांचे होत असणारे आदानप्रदान व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून होत असलेले वेबिनार सकारात्मक असल्याने राज्य शैक्षणिक दृष्ट्या अव्वल ठरत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे संघटना म्हणून शिक्षक संघटना म्हणून राज्य समन्वय समिती शिक्षक संघटनांचा राज्य महासचिव या नात्याने सार्थ अभिमान वाटतो.संघटनांच्या वतीने सर्वांच खूप खूप अभिनंदन करतो असे या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र राज्यतील शिक्षक संघटनांच्या एकत्रित येऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीचे राज्य महासचिव तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.राज्यातील शिक्षकांचे बरेच प्रलंबित प्रश्‍न तसेच पर्यवेक्षीय क्षेत्रातील आणि पदवीधर शिक्षक शिक्षकांच्या रिक्त जागा कडे देखील त्यांनी या पार्श्वभूमीवर लक्ष वेधले .महाराष्ट्र राज्य शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीकडे कायम अग्रेसर राहण्याचे दृष्टिकोनात सर्वांनी सातत्याने एकमेकाशी संवादी होऊन एकमेकाला मदत करत शैक्षणिक विकासासाठी ची कृतीची,लिखाणाची विचारांची वाचनसंस्कृतीची व शैक्षणिक उपक्रमांची चळवळ पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. व महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सर्व घटकांचे राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीने राज्य समन्वय समितीच्या वतीनेअभिनंदन केले.

Total Page Visits: 110 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply