(प्रतिनिधी= निखिल पाटील)नगरपालिका कार्यक्षेत्र असलेल्या परीसरात संध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येते आहे. यासाठी शहरातील शिक्षक आणी शिक्षीका यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. या कामकाजातुन महिला शिक्षकांना वगळावे अशी मागणीचे निवेदन पालिका मुख्याधिकारी सैरभ जोशी यांना बुधवार दि २३/९/२०२० रोजी दुपारी १२ वाजता महिला शिक्षकांनी दिले. सविस्तर वुत्त असे की शासनाच्या मार्फत संध्या माझे कूटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात येते आहे. यासाठी शहरातील शिक्षक आमी शिक्षीका यांना नियुक्त्या करण्यात आल्या आहे या कमी आम्हा तीनच महिलांची नियुक्ती केली असून. यापूर्वी देखील मे महिन्यापासून कोविड-19 प्रादुर्भाव उपाययोजना म्हणून वेळोवेळी दिलेली काम आम्ही केले आहे. परंतु आता आँन-लाईन आणी आँफ-लाईन अध्यापन सुरु असल्याने या कामातून आम्हाला वगळण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी यांच्या कडे. येथील नगरपालिका संचलित श्री ना वि ह पाटील विद्यालय आणी श्री आ गं हायस्कुल येथील शिक्षीका चारुलता सतिष चौधरी, भारती सतिष महाजन व प्रणाली नितीन काटे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणअधिकारी यांनी देखील दि २८/८/२०२० रोजी सर्व प्रांत अधिकारी आणी तहसीलदार यांना पत्र देऊन सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड-19 कामातुन कार्यमुक्त करावे अशी सूचना केली आहे. संध्या विद्यार्थ्यांना आँन-लाईन आणी आँफ-लाईन शिक्षण देण्यात येते आहे. त्यामुळे शिक्षकांना दुहेरी कामकाज करावी लागत आहे. तसेच स्व:च्या कुटूंबाची जबाबदारी कडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हाला या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी शिक्षक शिक्षिका यांनी केली आहे.

Total Page Visits: 518 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *