कोल्हापूरः अनिल पाटील

पंधरा वर्ष सत्तेत होते. स्‍पष्‍ट बहुमत होते. तरीही काँग्रेसवाले मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. यावरून मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजातील गरीबांना आरक्षण द्यायचे नाही हे दिसून येते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्‍यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आ. पाटील पुढे म्‍हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्ष सुरवातीपासूनच आक्रमक आहे. जे आबीसींना तेच मराठा समाजाला अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्‍यामुळे भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आम्‍ही आरक्षण मिळवून दिले. सत्तेवर आल्‍यानंतर हे आरक्षण देखील काँग्रेसच्‍या सरकारला टिकवता आले नाही. आता सरकार म्‍हणत आहे. नोकर भरतीमध्‍ये तेरा टक्के आम्‍ही बाजूला काढून ठेवू. सरकारचे कोण सल्‍लागार आहे ते माहित नाही. असे विधान करणे म्‍हणजे कायद्याबद्दल अज्ञान असल्‍याचे दाखविण्‍याचा प्रकार आहे.

तेरा टक्‍के स्‍वतंत्र जागा भरता येणार नाही. कारण ज्‍यावेळी पुन्‍हा तेरा टक्‍के जागांची भरती काढली जाईल तेव्‍हा पुन्‍हा अन्‍य जाती, जमातींचेही आरक्षण त्‍यात असणार आहे. आणि या तेरा टक्‍के जागा भरावयाच्‍या झाल्‍यास मराठा समाजाच्‍या आरक्षणाला मान्‍यता मिळाली पाहिजे. तरच या जागा सरकारला भरता येणार आहेत. आता खंडपीठाकडे जाण्‍याची चर्चा सध्‍या सुरू आहे. परंतू त्‍यामध्‍ये वेळ जाणार आहे. सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर भाजपची जी भूमिका होती जे ओबीसींना ते मराठा समाजाला ही भूमिका घेण्‍यास काय हरकत आहे. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन फी माफ करता येते. परंतू मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्‍यांना आपल्‍या समाजातील लोक रिकामे राहवेत, शहाणे होऊ नयेत असेच वाटत असते. कारण ती मानस त्‍यांच्‍या मागे फिरण्‍यास उपयोगी पडतात.

Total Page Visits: 697 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *