भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितदादा घाटगे यांची माहीती

कोल्हापूरःआनिल पाटील

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १४सप्टेंबर ते २०सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभर ‘सेवा सप्ताह’ म्हणून सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितदादा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक़्रमांनी हा सप्ताह साजरा होणार आहे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे झालेल्या बैठकीतमध्ये याबाबत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
या सेवासप्ताहानिमित गोरगरीब जनतेसाठी मदत ,पर्यावरणाचे संवर्धन,स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मंडळामध्ये दि.१४ सप्टेंबर रोजी प्रत्येक तालुकास्तरावर प्रत्येक गावांमध्ये किमान ७० झाडांचे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. ७० दिव्यांगाना कृत्रिम हात पाय आणि इतर उपकरणे प्रदान,गरीब गरजू लोकांसाठी ७०चष्म्याचे वाटप, रुग्णालयात किंवा सामान्य वस्तीमध्ये फळे वाटप, ७०रुग्णालयात ७० कोव्हिड रुग्णांना प्लाझ्मा दान , आरोग्य तपासणी शिबीर, भाजप युवा मोर्चा तर्फे ७० रक्तदात्यांचे रक्तदान शिबिराचे आयोजन,७० गावांमध्ये स्वच्छता अभियान, तसेच प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासकांच्याकडून वेबिनार माध्यमातून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि ध्येय यावर आधारित ७० व्हर्चुअल काॅन्फरन्स सभा आणि पंतप्रधान यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी ,योजना यांचे प्रदर्शन अशा विविध उपक़्रमांनी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितदादा घाटगे यांनी सांगितले.

Total Page Visits: 684 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *