कोल्हापूरः अनिल पाटील

सरपंच सेवा संघाचे पुणे विभाग समन्वयक पत्रकार सुरेश राठोड यांना बहुजन भीम सेना यांच्याकडून कोविंड योद्धा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे सलीम शेख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष कदम (सर) यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार वसंतराव निंगणुरकर म्हणाले “आज पर्यंत अनेक राजकीय पार्ट्या पाहिल्या पण सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणारे पक्ष आज पहिल्यांदाच पहात आहे. आणि भविष्यात ही या पक्षाकडून असेच कार्य समाजासाठी घडावे अशी आशा बाळगून या पक्षाला व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे दैनिकातील संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील कोरोना काळातील कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या कोरोना प्रतिबंधक कार्याबाबत प्रसिध्दीसाठी, जनतेमधील कोरोना बाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक जागृती त्यांनी केलेले प्रयत्न आणि कोरोना काळातील त्यांची कामगिरी याचा विचार करून सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सरपंच सेवा संघ समन्वयक सुरेश राठोड (दै. जनमत), शिवाजी शिंगे (मीडिया कंट्रोल), आयेशा सलीम शेख (न्यूज कोल्हापूर), सलीम शेख (कोल्हापुर न्याय), बरकतभाई पन्हाळकर (महान कार्य), शकील शेख, गौरव यादव (साप्ताहिक सिंहासन), पुनम सूळगावकर, दिलीप पाटील आदी दिग्गज मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. यासाठी बहुजन भीम सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भारत तुकाराम मोरे पाटील (पत्रकार) यांचे सहकार्य लाभले.
पत्रकार हे पत्रकारितेच्या या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना प्रसिद्धी माध्यमातून योगदान देतात यामुळे कोरोना काळात यांचे सहकार्य मोलाचे आहे. याबद्दल बहुजन भीम सेनेच्या वतीने आभार मानले .
सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूरस्काराचे वितरण सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करत सायंकाळी पाच वाजता लक्ष्मी नारायण हॉल, टेंबलाईवाडी, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार वसंतराव लिंगनूरकर यांच्या उपस्थितीत एका शानदार समारंभात प्रधान करण्यात आले.
यावेळी सचिन पाटील, प्रियांका बुलबुले, तेजस्विनी पेडणेकर व स्वराज्य प्रतिष्ठान ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Total Page Visits: 849 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *