कोल्हापूरः आनिल पाटील
जळगाव जिल्हा परिषदेचा ” सन 2020 चा आदर्श शिक्षक पूरस्कार ” जिल्हा परिषेद प्राथमिक कन्या शाळा साळवा ( ता. धरणगाव) जिल्हा जळगाव येथील शिक्षिका श्रीमती ज्योती लिलाधर राणे यानां जाहीर झाला आहे. पूरस्कार मिळाल्याचे पत्र त्यानां नूकतेच मिळाले आहे. या पूरस्कारामूळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उपक्रमशील, प्रयोगशील, शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून सध्या शाळा बंद असताना देखील ऑनलाईन, ऑफलाईन, गटपद्धतीने विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अध्ययन अध्यापनाचे कार्य पार पाङत आहेत . लवकरच या पूरस्कारांचे वितरण केले जाईल अशी माहीती शिक्षण विभागाकङून देण्यात आली
दरम्यान सिंधूदूर्गचे आमदार नितेश राणे” जळगाव शासकीय रूग्णालयाचे ङीन ङाँ. जयप्रकाश रामानंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.