कोल्हापूरःआनिल पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले आहे. पार्थ पवार यांना शरद पवारांनी यांनी फटकारल्या नंतर मोठी खळबळ उडाली होती. पार्थ पवार यांना सध्या भाजपवासी झालेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी देखील फेसबुक पोस्ट करत पार्थ पवार यांचा उल्लेख ‘जन्मजात फायटर’ असा केला होता. त्याच बरोबर नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी देखील पार्थ पवार यांचे कौतुक केले होते. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत?

दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. या महत्वपूर्ण बैठकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या घरवापासीची चर्चा झाली असल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीतून बाहेर पाडणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार आणि जयंत पाटलांना सोपवली जबाबदारी?

दरम्यान राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी अजित पवार आणि जयंत पाटील यांना देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीत अनेक भारतीय जनता पार्टीतील आमदारांचा प्रवेश होणार असल्याची देखील समोर येत आहे. त्यामुळे नेमकं भाजपला कोण राम राम ठोकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांचाही होऊ शकतो प्रवेश?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे देखील प्रवेश पुन्हा स्वगृही परतू शकतात? अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राणाजगजितसिंह पाटील आणि पवार कुटुंबियांचे रक्ताचे नाते असून, गेल्या अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याच्या बातम्यासमोर येत आहेत. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याने राणाजगजितसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश गुलदस्त्यात आहे.

सध्या आमदार राणा जगजितसिंग आणि त्यांचे सुपूत्र मुंबईत आहेत. काल तडकाफडकी ते मुंबईत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच आज दुपारी मुंबईतील निवासस्थानी मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांची गाठभेठही झाली असल्याचे समजते आहे.

मल्हार पाटील यांनी दिला होता पार्थ यांना पाठींबा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलच फटकारलं आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांची फटकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पूत्र मल्हार पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून, पार्थ पवार यांचा उल्लेख जन्मजात फायटर असा केला आहे. आमदार पुत्राने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मल्हार पाटील यांनी सदर पोस्ट नातेसंबधातून केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अस म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यानंतर मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबत असल्याचा सोशल मीडियाद्वारे इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांनी दिले होते संकेत

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील १२ आमदार भाजपच्या संपर्कात अशी बातमी आली आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ही अफवा असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली होती. पण त्यांनी यावेळी विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. असे संकेत दिले होते. त्याचा भाग म्हणून ऑपरेशन ‘राष्ट्रवादी पुन्हा’ करण्याचे ठरवले आहे. तशी रणनिती आखण्याचे काम सुरू आहे.

Total Page Visits: 223 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply