नूतन चिनावलचे माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश
चिनावल: ता- रावेर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.४० टक्के लागलेला असून प्रथम आचल चंद्रशेखर किरंगे ९६.६०%, द्वितीय प्राची किशोर आंबेकर ९४.४०%, तृतीय डिंपल सुहास नेहेते ९३.८०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलेले आहे .सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष किरण नेमाडे, उपाध्यक्ष खेमचंद्र पाटील, चेअरमन किशोर बोरोले,सचिव गोपाल पाटील,शालेय समिती सदस्य विनायक महाजन,सर्व संचालक वृंद प्राचार्य सौ.शारदा बैरागी,उपप्राचार्य जी.पी.लोखंडे,पर्यवेक्षक पी.एम. जावळे, शिक्षक प्रतिनिधी लीना भोळे, शिक्षकेतर प्रतिनिधी सी.सी. महाले यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.
Total Page Visits: 193 - Today Page Visits: 1