राजगृहावर हल्ला करणा-या समाजकंटकांना फाशी देण्यात यावी व राजगृहाला चोवीस तास संरक्षण देण्यात यावे
म्हणून भिम टायगर गृप व सामाजिक संघटना जळगाव जिल्हा तर्फे यावल येथे तहसिलदार यांचेकडे व पोलीस निरीक्षक सो यावल यांना निवेदन सादर करण्यात आले
दि. ७ जुलै २०२० रोजी दादर येथील समस्त आंबेडकरी अनुयायाची आस्था असणारे राजगृहवर काही समाजकंटकांनी जाणून बुजून हल्ला केला आहे. सर्वप्रथम आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो.
राजगृह हे केवळ घर नाही तर समस्त आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या जीवनाची कमाई अर्थात
पुस्तके ठेवली आहेत. केवळ पुस्तकाला घर बांधणे ही गोष्ट भारताच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासात अजरामर आहे. हाच इतिहास काही समाजकंटक पुसू आहेत , परंतु त्यांचे हे षडयंत्र आम्ही सफल होऊ देणार नाहीत. तेव्हा आपल्याला नम्रता पुर्वक विनंती करण्यात येते कि, याबाबतीत लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी . अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे
प्रदीप भाऊ वानखेडे जिल्हा अध्यक्ष. यांनी सांगितले प्रसंगी विनोद भाऊ भालेराव युवा जिल्हा अध्यक्ष, संदीप भाऊ निकम यावल तालुका अध्यक्ष ,शंकर भाऊ सावळे युवा तालुका अध्यक्ष ५ किरण भाऊ अडकमोल यावल तालुका युवा सचिव ६ पवन भाऊ वानखेडे युवा उपतालुकाध्यक्ष , अमोल सपकाळे,पंकज सपकाळे,प्रविण तायडे, सुखदेव शिरसाट,किरण तायडे, देवानंद भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Total Page Visits: 737 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *