स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सायहता निधीस 25,000/- चा चेक प्रदान

पलूस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सायहता निधीस 25,000/- चा चेक प्रदान

कोरोना विरुद्धच्या लढाईत पलूस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने गरजवंतांना 200 किट तहसीलदार यांचे कडे देण्यात येणार
आज जगभरात कोव्हिडं 19 या विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्या साठी शासन स्तरावर शरतीचे प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पलूस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने 25,000/- पंचवीस हजार रुपये चा चेक पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माणिकराव शिंदे,जयवंत जाधव,दिलीप धनवडे,पोपट जाधव महादेव खंबाळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदेंनी , 200 जीवनावश्यक वस्तूंचे किट देखील देणार असल्याचे इंडिया स्टींग न्युज शी बोलताना ते म्हणाले , आज स्वस्त धान्य दुकानावर शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन व सोशल डिस्टनसिंग चे पालन करत कार्ड धारकांना धान्याचे वाटप करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले व नागरिकांनी ही सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे व घरी राहून कोरोनाचा समूळ नष्ट करणेस शासनास सहकार्य करण्याची विनंती वजा आवाहन करण्यात आले ,
यावेळी संघटनेचे, निरंजन कदम,सचिन चव्हाण, विजय जाधव,पोपट आवटे,प्रवीण पाटील, सुमन गायकवाड, दिलीप जाधव, जयसिंग थिटे, वसंत शेळके आदी सदस्य उपस्थित होते.

Total Page Visits: 2120 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *