दुचाकी पार्किंगच्या वादातून शिवडीत दोन भावांचा खून
शेजारी राहणाऱ्या चौघांना अटक

मुंबई – दुचाकी पार्क करण्याच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शिवडी क्रास रोड परिसरात घडली. या प्रकरणी
रफी अहमद किडवाई मार्ग (आरएके मार्ग पोलीस) पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या चौघांना अटक केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलावर उपचार सुरू आहेत.
शिवडी क्रॉस रोड येथील म्युनिसिपल चाळ क्र. 46 च्या गल्लीत पटेल व शेख कुटुंबीय राहतात. दुचाकी पार्क करण्यावरून पटेल व शेख कुटुंबीयांमध्ये वाद झाला. करीम युसूफ शेख (35), युसूफ उमर शेख (70), मिनाज युसूफ शेख (35), मेहराज युसूफ शेख (65) व अदनान सत्तर पटेल (16), शाहिद रजाक पटेल (22), साहिल रजाक पटेल (16) हे आपसात भिडले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. त्यावेळी रागाच्या भरात करीम युसूफ शेख याने चाकूने
अदनान सत्तर पटेल, शाहिद रजाक पटेल, साहिल रजाक पटेल यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले असता शाहिद रजाक पटेल व साहिल रजाक पटेल या भावांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर जखमी अदनान पटेलवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात (आरएके मार्ग पोलीस) (गु.र.क्र. 115/20) भादंवि कलम 302, 307, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करून करीम युसूफ शेख, युसूफ उमर शेख, मिनाज युसूफ शेख, मेहराज युसूफ शेख यांना अटक करण्यात आल्याचे आर.ए.के. मार्ग पोलिसांनी सांगितले.

Total Page Visits: 345 - Today Page Visits: 18
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply