आदर्श तालुका घडवणारे तहसीलदार राजेंद्र पोळ व बी.डी.ओ.राहुल रोकडे

पलुस तालुका / प्रतिनिधी
अमर मुल्ला

पलूस तालुका महसूल विभाग
आदर्श तालुका घडवणारे
तहसीलदार राजेंद्र पोळ व बी.डी.ओ.राहुल रोकडे….

आगस्ट 2019 ला जो महापूर आला होता त्यावेळी लाखो करोडो रुपयाचे नुकसान झाले होते
अनेकांची घरे , जनावरांचे गोठे, व्यापाऱ्यांची दुकाने उध्वस्त झाली होती, पुरग्रस्तांच्या मदतीला राज्यातून मदतीचे लोंढे लागले होते, पूरग्रस्तांना कपडे, अंथरुण पांघरूण , तसेच अन्नधान्य पुरवठा मदतीच्या रूपाने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन येत होता.त्याचे योग्य पद्धतीने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचे यशस्वी रित्या काम हे तालुक्याचे तहसीलदार राजेन्द्र पोळ व बि.डी.ओ मा.राहुल रोकडे व संपूर्ण महसूल विभागाणे व सहकाऱ्यांनी बखुबी पार पाडत जिल्ह्यातच न्हवे तर राज्याच्या इतर तालुक्यांनीही पलूस तालुक्याचा आदर्श घ्यावा अशी भूमिका बजावली होती आज अश्याच प्रमाणे शासकिय आर्थिक मदत मंजूर करून देण्यात आली व .त्याचेच कार्यालयीन काम चालू असतानाच जगासमोर कोरोणा सारखे महाभयंकर संकट समोर आले.या संकटावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ने जनता कर्फ्यु व लॉक डाऊन लागू केले.
पलूस तालुका तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी जैविक महासंकटाच्या काळात अतिशय चोखपणे व नियोजन बध्द निर्णय घेतले आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकारने२२ तारखेपासून पुकारण्यात आलेले संचार बंदी व लाॅकडाऊन काळाचे काटेकोरपणे पालन करताना पलूस तालुक्यात परदेशी आलेले नागरिक यांची माहिती घेऊन वेळीच त्या नागरिकांना होमकोरोंटाईन करण्याचे निर्देश दिले.तसेच राज्यातून व परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन आरोग्य विभाग व पोलीसांना सुचना देऊन त्या संबंधित नागरिकांची माहिती घेण्यात आली.आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी प्राथमिक चौकशी करून त्या नागरिकांकडे कोणती आरोग्य विषयक लक्षणे दिसून येतात का याची कसून तपासणी करण्या बरोबर संबंधित लोकांवर लक्ष्य केंद्रित करत त्याचा आरोग्यावर वेळोवेळी कोणते बदल होत आहेत या कडे मोर्चे बांधणी करण्यात आली. या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बंदी लागू करण्यात आलेल्या काळात अतिशय चोखपणे काम करत असताना जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही असेच निर्णय घेतल्याचं चित्र दिसून येत आहे.बाहेरून आलेल्या कामगारांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून वेळीच सामाजिक , राजकीय पक्ष,संस्था, काही कंपन्याच्याकडे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आवाहन केले.
जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेनुसार गोरगरीब, कामगार यांची माहिती घेऊन त्यांना वाटप केले. भटक्या जमाती च्या मागणीनुसार त्यांना जागेवर जाऊन स्वतः त्या त्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तालुक्याचे तहसीलदार यांनी वाटप केले. अजूनही बाहेरून आलेल्या कामगारांना किट वाटप करण्याचे काम सुरूच आहे.योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची पात्रता व जनतेच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असणारा पलूस तालुक्याचा कणखर कणा असणारा तहसीलदार राजेंद्र पोळ व बी,डी,ओ, राहुल रोकडे. व या सर्व परिस्थितीत हिरीरीने साथ देणारा महसूल विभाग तसेच पोलीस यांचा जनते मधून उमटतोय आभाराचा सूर.तुम्ही तुमच्या कार्याने मोठ मोठ्या आव्हानास परतवून लावण्याची व तालुका व येथील जनता कश्या पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल याचे आव्हान पेलत असताना स्वतः मी व इतर माध्यमातील माझ्या नजरेत पाहिलेली एक गोष्ट म्हणजे आपण आपली जबाबदारी पार पाडत असताना दिवस दिवस फक्त चहा व पाण्यासोबत काढले हे आमच्या प्रसार माध्यमं पासून लपलेलं नाही पुनःश्च आपले व आपल्या देशसेवा जनसेवा या कामास सर्व जनतेचा सलाम …..

Total Page Visits: 2249 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *