दोंडाईचात श्रीराम जनसेवा सोशल ग्रुप तर्फे दररोज गरजूंना दोन वेळचे अन्नदान…

दोंडाईचात श्रीराम जनसेवा सोशल ग्रुप तर्फे दररोज गरजूंना दोन वेळचे अन्नदान…

दोंडाईचा- कोरोना रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या तीन आठवड्यापासून लॉकडाऊन झाल्यामुळे गोरगरीबांचे अतोनात हाल होत आहेत. अशा परस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी शहरातील विविध संस्था धावून येत आहेत. दोंडाईचा येथील श्रीराम जनसेवा सोशल ग्रुपच्या वतीने दररोज ५०० ते ६०० गोरगरीबांना अन्नदान केले जात आहे.
समाजाचे आपण काही देणे लोगतो उदात्त भावनेतून दोंडाईच्यातील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम राजपूत, महेंद्र रुणवाल, ललित रुणवाल, सचिन बाविस्कर, व दिपक रुपचंदाणी, हे लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. दोंडाईचा शहरातील रमाई नगर, राणीपुरा भिलाटी, राऊळ नगर भिलाटी, संत गबीरदास नगर, सालदारवाडी, शाहदा रोड भिलाटी, चैनी रोड परिसर, गोविंद नगर, संगम दूध डेरी परिसर, डाबरी घरकुल परिसर डालडा मिल, मार्केट यार्ड या सर्व परिसरातील मजुरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यामुळे या ग्रुपच्या वतीने गोरगरीबांना अन्नदान केले जात आहे. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड परिसर व गावातील गरजूंना जागेवर जाऊन अन्नदान करत आहेत.
जेवणासाठी लोक घरून भांडे घेऊन जातात. कुटुंबातील एक सदस्य रांगेत उभा राहतो कुटुंब संख्या तपासून तेवढ्या संख्येने जेवनाचा पुरवठा केला जातो. जेवन वाटप होतांना सोशल डिस्टन्स चे परिपूर्ण पालन करण्यात येत आहे. या ग्रूपचे वैशिष्ट्य म्हणजे भाजी कापण्यापासून ते भांडे धुण्यापर्यंत सर्व काम स्वत: ग्रुपमधिल सदस्य स्वच्छेने करीत आहेत. यात सिंहांचा वाटा म्हणून ग्रुपचे उपाध्यक्ष महेंद्र भाऊ रुणवाल यांनी व्यापारी भवन पुर्णपणे वापरण्याची मुभा दिली आहे. ग्रुपचे अध्यक्ष घनश्याम राजपूत, उपाध्यक्ष महेंद्र रुणवाल, सचिव ललित रुणवाल, तसेच सदस्य सचिन बाविस्कर दिपक रुपचंदाणी, रवींद्र टाटीया, शिवा चौधरी, जयपाल जमादार, गणेश चकणे, मनोज काकडे, राका सेठ रुपचंदाणी, सुजित कांगणे, सचिन बोरसे, विशाल वाघ, विजय रुपचंदाणी, अॅड. प्रमोद मराठे, दिपक केसवाणी, तसेच अनिता राजपूत, सीमा रुणवाल, सुवर्णा रुणवाल, आदी या उपक्रमात परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाला अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ दिपक सावंत, पोलिस स्टेशनचे सा. पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक कृष्णा नगराळे यासह आदींनी चे मार्गदर्शन लाभले.

Total Page Visits: 2408 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *