रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार

रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार
रावेर दि प्रतिनिधी
शहरात करोना विषाणू संचारबंदी सुरु असून नागरिक आपापल्या घरांमध्ये अडकून आहेत परंतु शहरातील सफाई करण्याचे काम करणारे कर्मचारी रस्त्यावर आपले आरोग्य धोक्यात टाकून फिरत आहेत त्यांचा जागृती महिला मंडळ पदाधिकारी यांनी गौरव करून त्यांचे आभार मानल्याने सफाई कामगार भारावले आहेत.
रावेर नगरपालिके मधील सफाई कर्मचारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सफाईचे काम अथक परिश्रमाने करीत असून त्यांचे देखील आरोग्य आहे परिवार आहे पण सर्वांच्या हितासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा जागृती महिला मंडळ तथा महिला दक्षता समिती अध्यक्षा श्रीमती कांता बोरा यांनी आपल्या सर्व सहकारी भगिनीसह सकाळी सकाळी कचरा उचलून रस्ते आणि गटारी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून औक्षण देखील केले आणि प्रत्येकास एक मोठा रुमाल देवून आभार मानले. यावेळी त्यांचे सोबत सौ अंकिता बोरा, कल्पना वाणी, सिंधू गाडे, मधुरा वाणी आदींसह मीठाराम महाजन, एकनाथ महाजन, अश्विन परदेशी, ह्रिदम बोरा, यश बोरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Total Page Visits: 1022 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *