परधाडे येथे अवैध वाळूचे ५ ट्रॅक्टर जप्त
.महसूल पथकाची एकाचवेळी धडक कारवाई
पाचोरा –कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी असताना पाचोरा तालुक्यात गिरनेचे वस्त्र हरण करीत वाळू माफियांचा मुक्तसंचार होत आहे.अशा परिस्थितीत अवैध वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात दै लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याच दिवशी धडक कारवाई महसूल विभागाने केली. गिरणीच्या काठावरील परधाडे या गावीएकाच ठिकाणी पाच ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल विभागाने जप्त केली. कोरोनाव्हायरस संदर्भात महसूल प्रशासन पोलीस प्रशासन पूर्णपणे व्यस्त असताना त्याचा गैरफायदा घेत वाळूमाफिया सुशांत पणे वाळूची तस्करी करीत आहे. आज महसूल विभागाने धडक कारवाई करून तब्बल पाच ट्रॅक्टर जप्त केले. यासाठी
तहसीलदार कैलास चावडे , मंडळ अधिकारी पवार, मंडळ अधिकारी नवरदेवळा साळुंके, पाचोरा तलाठी आरडी पाटील, भारत गायकवाड, मयुर आगरकर, सागर बागुल स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झाली. अशाचप्रकारे अवैधरित्या वाळू साठे केलेल्या बांधकाम व्यावसायिकांवर साठ्याचा लिलाव करून कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.