महसूल विभागाचेही कोरोना हद्दपार करण्यासाठी बाजी

पलुस तालुका प्रतिनिधी
अमर मुल्ला..

महसूल विभागाचेही कोरोना हद्दपार करण्यासाठी बाजी

पोलिस आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस यांचे शर्तीचे प्रयत्न आपण वाचत,ऐकत आणि बघत आहोत ,त्यांचे खरच करावे तेवढे कौतुक थोडे आहे. याच लढाईत जीवाची बाजी लावून कोरोनाला धुडकावून लावण्यात एक विभाग जिवाच्या आकांताने पर्यत करत आहे आणि तो म्हणजे महसूल विभाग. जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार , क्लार्क आणि शिपाई हे लोक सध्या स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करत आहेत ,कारण आपत्ती व्यवस्थापन , पाणी पुरवठा, टंचाई इ.जवळपास सर्व विषय महसूल प्रशासन सांभाळत आहे,त्याचबरोबर प्रत्येक नाक्यावर व गावागावात पोलीसांसोबत खांद्याला खांदा लावून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. रोज रोज सरकारकडून येणाऱ्या सूचना ,आदेश यांची अंमलबजावणी करणे व सर्व विभागावर नियंत्रण ठेऊन जिल्हा नियोजनाचे काम महसूल करत आहे ,याची कदाचित आपल्याला माहिती नसेल. गेल्या काही दिवसांपासून या लोकांना वेळेवर जेवणही करायला भेटत नाहीये , सकाळी 9 ते रात्री 10 कार्यालयात काम करने आणि नंतर घरी असतांनाही अलर्ट राहून नियोजनात्म कारवाही करणे ,हे यांचे जीवन झाले आहे.
सामान्य लोकांची नेहमीच ओरड असते की प्रशासन काम करत नाही ,त्यांना लोकांच्या हिताची काही गरज नाही , आता प्रशासन जिवाच्या आकांताने काम करत आहे , लोकांच्या हितासाठी फक्त , त्यांना सहकार्य करा. कारण रोज कोरोनाला समूळ नष्ट करण्याच्या या लढाईत या महसूल विभागाच्या लोकांची घरी वाट बघत आहे , त्यांचा भाऊ, आई ,बाबा, बहीण, बायको आणि कदाचित नुकताच जन्मलेले त्याच बाळ असेल.

Total Page Visits: 1467 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

1 thought on “महसूल विभागाचेही कोरोना हद्दपार करण्यासाठी बाजी

  1. महसूल विभाग ज्यांच्या भरवशावर चालतो जो सर्व आदेशांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो तो कोतवाल, तलाठी व मंडळ अधिकारी दिसला नाही याची फार मोठी खंत वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *