संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आ रावल यांच्या हस्ते 250 कुटूंबात किराणा वाटप

दोंडाईचा – संत निरंकारी चॅरीटेबल तर्फे कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव बघत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे यांच पार्श्वभूमी बघत सध्या शहरातील हातमजुरी करणाऱ्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे ही गंभीर परिस्थिती बघत संत निरंकारी चारीटेबल तर्फे सद्गुरु माता सुदिक्षा संविदर हरदेवजी महाराज यांच्या आदेशानुसार व तसेच धुळे झोनचे झोनल इन्चार्ज हिरालाल जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे झोन ३६-बी अंतर्गत प्रत्येक शाखेत आपल्या साध-संगत व इतर परीवार मधील ज्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अशा परीवाला मंडळाच्यावतीने शिधा रेशन आणि किराणा वाटप माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दोंडाईचा शाखेचे मुखी प.आ. निर्मला बहनजी, सेवादल इन्चार्ज आ. संजय वाघ, बांधकाम सभापती निखिल जाधव, नगरसेवक संजय मराठे, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, भरतरी ठाकूर, संजय तावडे, सभापती नरेंद्र कोळी, योगेश ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी २५० गोरगरिब कुटुंबाला अन्नधान्य, शिधा राशन व किराणा वाटप वाटप करण्यात आला यात गहू, चहा पावडर, मिरची पावडर, तांदूळ, साखर बिस्कीट, इत्यादी वस्तू समावेश होता.

Total Page Visits: 944 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *