
संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून ८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुरगाणा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह ,यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण शर्मिष्ठा वाळावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , पोलीस निरीक्षक दिवानसिंंघ वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे, महेश डंबाळे.राहूल जोपळे, इंद्रजित बर्डे, हेमंत भालेराव,याांनी यावर अनोखा उपाय शोधून बिनकामी फिरणाऱ्या युवकांच्या दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला. मंगळवार दिवसभर पोलिसांनी ८ दुचाकी जप्त केल्या होत्या.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केले असताना व संचारबंदीचा आदेश असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या दोघांवर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे