दोंडाईचा शहरातील शाहदा रोड परिसरातील तरूणांनी केले गरीबांना अन्नदान..

देशातील सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी संपूर्ण भारत देश २१ दिवस लॉकडाऊन झाला आहे. अशा वेळेस सर्व व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. संपूर्ण व्यवसाय बंद पडले आहेत. सर्व सामान्य गरीब कुटुंब मोलमजुरी करणारे हवालदिल झाला आहे. ही परिस्थिती बघत अशा वेळेस जे परिवार हातावर पोट भरून पोटाची खळगी भरणाऱ्या परिवारवर उपासमारीची वेळ येऊन गेली आहे. ही गंभीर परिस्थिती बघता दोंडाईचा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजू बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहदा रोड परिसरातील तरूण मित्रांनी प्रत्येकाच्या घरुन दहा दहा चपाती बनवून व बटाट्याची भाजी तयार करुन शंभर ते दीडशे कुटुंबाच्या पोटाला आधार दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजू बापू पाटील पत्रकार समाधान ठाकरे, जगदीश धनगर, भरत वाघ, मुकेश पाटील, दिपक पाटील, योगेश वाघ, अजय वाघ, अमोल पाटील, दिपक गिरासे, योगेश महाजन, राकेश सोलंकी, अंकुश वाघ, मच्छिंद्र कोळी, शभिर शेख, कमलेश मराठे, दानेश, नयनेश धनगर, आदी उपस्थित होते.

Total Page Visits: 854 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *