आयुर्वेद औषध विक्री करणाऱ्यां कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप..

जागतिक जैविक संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने आपल्या देशात जनता क्रफ्यू लागू केला आहे.
अशातच सांगली जिल्हामध्ये बाहेरून आलेले आयुर्वेद औषध विक्री साठी पलुस येथे विक्रेते आले आहेत.
जनता क्रफ्यू असल्यामुळे औषधं विक्री बंद झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या लोकांनी पलुस तहसील कार्यालयात येथे धाव घेतली व निवासी नायब तहसिलदार राजेंद्र पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली .
पाटील यांनी ही हकीकत पलुस चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्या समोर मांडली .
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गरजू लोकांना मदत करण्यास सांगितले.
नायब तहसिलदार यांनी अमोल पाटील व प्रशांत सावंत यांच्या कडे जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साखर , तांदूळ , साबण अशा वस्तूंचे किट तयार करून पलूस चे तहसिलदार,नायब तहसीलदार, पोलीस, मिडिय रिपोर्टरयांच्या सोबत जाऊन औषध विक्रेत्यांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.

Total Page Visits: 51 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply