लोहारा ग्रामस्थ देताय कोरोना व्हायरस ला आमंत्रण

लोहारा तालुका पाचोरा येथील व परिसरातील नागरिक कोरोना व्हायरस संदर्भात गांभीर्याने घेत नसल्या च चित्र दिसत आहे ,जगतिक महामारी म्हणून या कडे बघितलं जात असल तरी ग्रामीण भागातील लोकांनी याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्यान घेणं आवश्यक आहे ,कलम 144 लागू असतांना ,त्यातच देशभर लॉक डाऊन असतांना सुद्धा लोक घरा बाहेर पडत आहे ,या मुळे या विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एक पर्याय आहे ,मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असतांना सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करत असल्याचं दिसत आहे ,लोहारा येथील पोलीस कर्मचारी आर के पाटील आपल्या जीवाची पर्वा न करता ,वारंवार जनतेला सूचित करत आहे गर्दी करूनका घरात बसा ,परंतु जनता प्रति साद देत नसल्याचं चित्र लोहारा येथे पहायला मिळाल ,तरी या पुढे जर असच राहील तर लोहारा व परिसरात भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची भावना काही सुज्ञ नागरिकांन कडून व्यक्त करण्यात येत आहे तसेच लोहारा येथील भाजी पाला विक्रेते यांनी सुद्धा एकाच ठिकाणी विक्रीला न बसता लांब लांब बसून विक्री करावी ,येत्या दोन दिवसात परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य न केल्यास व अशीच परिस्थिती दिसल्यास पोलीस प्रशासनाकडून योग्यती कार्यवाही केली जाईल

Total Page Visits: 1052 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *